जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Railway Knowledge: भारतातील पहिली एयर कंडीशनर ट्रेन, AC नव्हता मग कोच थंड कसं ठेवायचे? इंट्रेस्टिंग आहे उत्तर

Railway Knowledge: भारतातील पहिली एयर कंडीशनर ट्रेन, AC नव्हता मग कोच थंड कसं ठेवायचे? इंट्रेस्टिंग आहे उत्तर

भारतातील पहिली एसी ट्रेन

भारतातील पहिली एसी ट्रेन

भारतात 1934 मध्ये पहिल्यांदाच ट्रेनमध्ये एसी कोच जोडण्यात आला होता. मात्र त्या ट्रेनची सुरुवात 1 सप्टेंबर 1928 मध्ये झाली होती आणि ती आजही सुरु आहे. देशातील पहिल्या एसी ट्रेनचे इंट्रेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 जून : भारतीय रेल्वेचा इतिहास हा जवळपास 150 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. या दीर्घ कालावधीमध्ये रेल्वेचा कायापालट झाला आहे. एकेकाळी ट्रेन कोळशावर चालायची. मात्र आज ट्रेन वीजेवर चालते. गेल्या 2 दशकांमध्ये भारतीय रेल्वेमध्ये प्रवासी सुविधांविषयी मोठे बदल करण्यात आले आहेत. जनरल, स्लीपर आणि एयर कंडीशन कोच अजूनच चांगले होत आहेत. मात्र भारतातील सर्वात पहिली एसी ट्रेन कोणती होती हे तुम्हाला माहीतीये का?

News18लोकमत
News18लोकमत

 तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात ब्रिटीशांच्या काळात ट्रेनमध्ये एसी कोच सुरू करण्यात आले होते. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ट्रेनमध्ये पहिल्यांदा एसी ,कोच वापरण्यात आला होता, ती ट्रेन आजही सेवेत आहे. देशातील पहिल्या एसी ट्रेनचा मजेदार इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेनमध्ये जवळपास 90 वर्षांपासून एसी कोच आहे ‘द फ्रंटियर मेल’ ही भारतातील पहिली एअर कंडिशन ट्रेन होती. ज्यामध्ये 1934 मध्ये एसी कोच बसवण्यात आला होता. मात्र, ही ट्रेन 1 सप्टेंबर 1928 रोजी सुरू झाली, त्यावेळी तिचे नाव पंजाब मेल होते. 1934 मध्ये, त्यात एसी कोच जोडला गेला तेव्हा ट्रेनचं नाव फ्रंटियर मेल असे बदलले गेले. ही ट्रेन अजूनही प्रवाशांच्या सेवेत आहे आणि 1996 मध्ये तिचे नाव बदलून गोल्डन टेंपल मेल करण्यात आले. Railway Facts: विजेवर चालणाऱ्या लोखंडाच्या ट्रेनमध्ये का उतरत नाही करंट? इंट्रेस्टिंग आहे कारण ट्रेनचा एसी कसं काम करायचा? 90 वर्षांपूर्वी एसी सारख्या उपकरणाचा शोध लागलेला नव्हता. अशा वेळी डबा थंड ठेवण्यासाठी बोगीखाली बर्फाचे तुकडे टाकण्यात आले आणि प्रवाशांना गारवा वाटावा यासाठी वरुन पंखे चालवले जात होते. हा बर्फ वितळल्यानंतर मार्गावरील स्टेशनवर पुन्हा बर्फाचे तुकडे भरले जात होते. त्यावेळी फक्त ब्रिटिश नागरिक फ्रंटियर मेलने प्रवास करत असत. Indian railway: या आहेत देशातील सर्वात लांब प्रवासाच्या ट्रेन, 5-10 तास नाही तर लागतात 3-4 दिवस! देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी ही ट्रेन धावत होती. त्यामुळे मुंबईमार्गे पाकिस्तानातील पेशावरला जात असे. या काळात ही ट्रेन दिल्ली, भटिंडा, फिरोजपूर आणि लाहोरमधून जायची. ही ट्रेन त्यावेळी देशातील सर्वात वेगवान ट्रेन मानली जात होती. ज्यावेळी कोणाला तार पाठवायची असेल तेव्हा ती या ट्रेनच्या गार्डद्वारे पाठवली जायची. या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या प्रवाशांना जेवणही दिले जात होते. स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर ही ट्रेन मुंबई आणि अमृतसर दरम्यान धावू लागली आणि 1996 मध्ये तिचे नाव बदलून गोल्डन टेंपल करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात