Railway Helpline Number: भारतातील कोट्यवधी लोक हे ट्रेनने प्रवास करतात. अशा वेळी ट्रेनने प्रवास करताना कोचमध्ये स्वच्छता नसणे किंवा लाइट नसणे तसंच मोबाईलचा चाजिंग पॉइंट खराब असणे एवढंच काय तर टॉयलेटमध्ये पाणी नसणे अशा अनेक समस्यांचा प्रवाशांना सामना करावा लागत असतो. पण बरेच प्रवासी मजबुरी समजून या सर्व समस्यांचा सामना करतात. तर काहींना वाटते की, तक्रार करावी पण तक्रार करुनही जोपर्यंत रेल्वे समस्या सोडवेल तोपर्यंत आपलं स्टेशन येईल. मग तक्रारच कशाला करायची. पण असं नाही. प्रवासादरम्यान तुमच्या समस्यांचे 15 मिनिटात समाधान होऊ शकते. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक नंबर डायल करावा लागेल.
तुम्हाला ट्रेनमध्ये अशी काही अडचण आल्यास तुम्हाला 7208073768/9904411439 वर कॉल करून तुमची समस्या सांगावी लागेल. या नंबरवर कॉल करून तुम्ही कोचची स्वच्छता, लाईट, एसीतील बिघाड आणि अस्वच्छ ब्लँकेट आणि उशा यासारख्या समस्या सोडवू शकता. फोन कॉलसोबतच तुम्ही रेल्वेला तुमच्या प्रॉब्लमविषयी एसएमएसद्वारेही माहिती देऊ शकता. लगेच होईल कारवाई तुम्ही तक्रार केल्यावर रेल्वे लगेच अॅक्शन घेईल. तुमचा कोच खराब असेल तर रेल्वे ट्रेनमध्ये असलेल्या क्लिनिंग स्टाफला कोचमध्ये पाठवून स्वच्छता करुन घेईल. यासोबतच इलेक्ट्रिसिटी संबंधीत खराबीसाठी मॅकेनिक कोचमध्ये पोहोचेल. ही सेवा सध्या 2167 ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. कॉल केल्यावर तुम्हाला तुमच्या समस्येसह ट्रेन नंबर, पुढचं रेल्वे स्टेशन, कोच नंबर आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगावा लागेल. Indian Railway : रेल्वेत फर्स्ट क्लास तिकीट का असतं एवढं महाग? कोणत्या स्पेशल सुविधा मिळतात? घ्या जाणून तुम्ही एसएमएसद्वारेही तक्रार करू शकता फोन कॉल व्यतिरिक्त, तुम्ही एसएमएसद्वारे देखील आपल्या समस्येचे निराकरण करू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या मेसेज बॉक्समध्ये CLEAN लिहावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 10 अंकी PNR टाकावा लागेल. यानंतर, साफसफाईसाठी C, पाण्यासाठी W, कीटक नियंत्रणासाठी P, लाईट AC साठी E आणि किरकोळ दुरुस्तीसाठी R लिहून मोबाईल नंबर 7208073768 किंवा 9904411439 वर पाठवा. Indian Railway : रोज रात्री 45 मिनिटांसाठी बंद होते तिकीट बुकिंग, अवश्य जाणून घ्या वेळ समस्या ऑनलाइन सांगा रेल्वे वेबसाइट cleanmycoach.com वर, तुम्ही लाईट, साफसफाई आणि ब्लँकेट उशांपासून अनेक प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकता. या साइटवर जाताच तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा कोच नंबर, बर्थ नंबर, पीएनआर नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. तुमची तक्रार पहिले मुंबईतील कार्यालयात पोहोचेल. त्यानंतर ते एसएमएसद्वारे ट्रेनच्या स्टाफपर्यंत पोहोचेल.