नवी दिल्ली, 10 जुलै : भारतातील लोक दूरच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. ट्रेन हा स्वस्त आणि सोयीचं साधन मानलं जातं. तुम्हीही ट्रेनने प्रवास केलेला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की, यामध्य विविध कॅटेगिरी असतात. यामध्ये जनरल, स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी असे पर्याय असतात. या सर्वांच्या भाड्यांमध्येही अंतर असतं आणि त्यानुसार यामध्ये वेगवेगल्या सुविधाही मिळतात. फर्स्ट एसीचे भाडे थर्ड एसीच्या तिप्पट आहे. म्हणजेच त्याचे तिकीट विमानाच्या तिकिटाइतके महाग होते. एवढं जास्त भाडे देऊन प्रवाशांना कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.
फर्स्ट एसीमध्ये कोणत्या सुविधा मिळतात? फर्स्ट एसीमध्ये तुम्हाला इतर श्रेणींपेक्षा अनेक सुविधा मिळतात. यामध्ये तुम्हाला पर्सनल केबिनची सुविधा मिळते. ज्यामध्ये फक्त दोन जागा आहेत. यासोबतच तुम्हाला फर्स्ट एसी तिकिटावर जेवण, नाश्ता आणि चहा कॉफी मोफत दिली जाते. त्याचबरोबर त्यात मिळणारे खाद्यपदार्थही इतर डब्यांमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थापेक्षा चवदार असतात. यासोबतच ते बनवताना वापरण्यात येणाऱ्या वस्तूही क्वालिटीच्या असतात. Train Ticket Rate: रेल्वेने केली भाडे कपातीची घोषणा! 25% स्वस्त झालं ट्रेनचं तिकीट प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी बेस्ट तुम्हाला अशा ट्रिपला जायचे असेल जिथे तुमच्यासाठी प्रायव्हसी मेंटेन करणे आवश्यक आहे, तर तुम्ही फर्स्ट एसीमध्ये प्रवास करू शकता. जर तुम्ही दोन व्यक्ती असाल आणि फर्स्ट एसी मधून प्रवास करत असाल तर केबिन बंद करून तुम्ही तुमची गोपनीयता राखू शकता. फर्स्ट क्लासमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये प्रायव्हसीचा पहिला नंबर येतो. येथे तुम्ही शांतपणे प्रवास करू शकता आणि इतर कोणताही प्रवासी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. Indian Railway: भारतातील सर्वात लांब ट्रेन, 6 इंजिन, 295 डबे! एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास लागेल 1 तास स्वच्छतेची घेतली जाते काळजी रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्येही स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. यामध्ये तुम्हाला अतिशय स्वच्छ केबिन मिळते. यासोबतच फर्स्ट एसी कोचचे केटरिंगही चांगल्या पद्धतीने केले जाते. या सुविधांसाठीच प्रवाशांकडून फर्स्ट एसीचे इतके जास्त भाडे आकारले जाते.