Indian Railway : भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. यापैकी जास्तीत जास्त लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. तुम्हाला असं माहिती असेल की, ऑनलाइन ट्रेनचं तिकीट तुम्ही कधीही बुकिंग करु शकता. हे बऱ्याच अंशी खरं देखील आहे. पण हे 100 टक्के सत्य नाही. खरंतर रात्रीच्या वेळी 45 मिनिटांसाठी ट्रेनचं तिकीट बुक करता येत नाही. ही वेळ म्हणजे 11.45 ते 12.30 वाजेपर्यंत असते. खूप कमी लोकांना याविषयी माहिती असेल. पण असं का होतं हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण याचं कारण जाणून घेणार आहोत.
पूर्वी रेल्वे 24 तासांपैकी 23 तास बुकिंग पोर्टल उघडे ठेवायची. दिवसाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या 30-30 मिनिटांत कोणतेही तिकीट बुक केलं जात नव्हतं. म्हणजे तिकीट बुकिंग दिवसभरात 12 ते 12.30 आणि रात्री 11.30 ते 12 पर्यंत थांबत असे. मात्र, प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यात 15 मिनिटे कपात करून वेळ 11.30 ते 11.45 करण्यात आली. Indian Railway च्या टॉप 10 ट्रेन! प्रवासासाठी आहेत बेस्ट, जेवणासह सर्वच सुविधेत एक नंबर बुकिंग का थांबवली जाते? रेल्वे सकाळी 11.45 ते रात्री 12.30 पर्यंत तिकीट बुक करत नाही. त्यामागचे कारण म्हणजे सर्व्हर आहे. या 45 मिनिटांत रेल्वे आपला सर्व्हर दुरुस्त करते. यामुळेच स्टेटस चेकिंग, तिकीट बुकिंग, पीएनआर चेकिंग इत्यादी IRCTC किंवा कोणत्याही तिकीट पोर्टलवर थांबतात. Train Routes : डेस्टिनेशनपेक्षा सुंदर आहेत ट्रेनचे हे रस्ते! कुठून दिसतो समुद्र तर कुठून पर्वत दररोज 8 लाख तिकिटे केली जातात बुक भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. येथे दररोज 2 कोटीहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. दररोज 7-8 लाख लोक IRCTC वेबसाइटवर तिकीट बुक करतात. यामुळेच त्याचा सर्व्हर सुरळीत चालण्यासाठी दररोज त्याचे मेंटेनेंस केले जाते. फार कमी लोकांना माहिती आहे की, जे काही तिकीट बुक केले जाते, त्याची सेकेंड कॉपी मेन्टेनन्स दरम्यान तयार केली जाते. यामुळे प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून डेटा हरवल्यासही बॅकअप तयार असतो.