मुंबई, 31 ऑगस्ट : 1 सप्टेंबरपासून पैसे काढण्याबद्दल नवे नियम असणार आहेत. एका मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर 2 टक्के TDS लागणार आहे. एका आर्थिक वर्षात एक कोटी रुपये जर बँक, पोस्ट ऑफिस किंवा को ऑपरेटिव्ह बँकेतून काढले तर हा TDS लागेल. हा निर्णय कॅशलेस व्यवहारांना उत्तेजन देण्यासाठी आणि मोठ्या रकमेच्या रोकड व्यवहारांना आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. असं असलं तरी हा नियम सरकार, बँकिंग कंपन्या, सहकारी बँका, पोस्ट ऑफिस यांना लागू होणार नाही. 2017- 2018 या आर्थिक वर्षात 448 कंपन्यांनी बँक खात्यातून 5.56 लाख कोटी रुपये रोकड काढली आहे. या 448 कंपन्यांनी त्यांच्या बँक खात्यातून एक वर्षात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली. या कारणामुळेच सरकारने बँक खात्यातून एक वर्षात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढणाऱ्या व्यक्तींवर टीडीएस लावला आहे. आणखी एक नियम बदलणार 1 सप्टेंबरपासून कुणीही व्यक्ती किंवा कंपनीला कॉन्ट्रॅक्टर किंवा व्यावसायिकाला वर्षभरात कोणत्याही सेवेसाठी 50 लाख रुपये देत असेल तर त्याला 5 टक्के TDS द्यावा लागेल. घर बांधताना किंवा लग्नसमारंभासाठी जर काही रक्कम द्यायची असेल तर त्यावर हा TDS बसणार आहे. तुमचं या बँकेत खातं आहे का? बँकांच्या एकत्रीकरणामुळे हे होणार बदल देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मधून पैसे काढायचे असतील तर आता नवे नियम असतील. बँक गैरव्यवहारातून ग्राहकांना वाचवण्यासाठी SBI आता नियम बदलणार आहे. मागच्याच आठवड्यात कॅनरा बँकेनेही पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्यासाठी OTP द्यावा लागेल. SBI सुद्धा लवकरच ग्राहकांसाठी हा नियम लागू करणार आहे. तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर आधी फोनवर OTP येईल. हा OTP दिल्यानंतरच पैसे मिळू शकतील. ==================================================================================== कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.