जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Privatisation: 5 सरकारी बँका शॉर्टलिस्ट, दोन बँकाच्या खाजगीकरणाविषयी 14 एप्रिलला होणार निर्णय

Bank Privatisation: 5 सरकारी बँका शॉर्टलिस्ट, दोन बँकाच्या खाजगीकरणाविषयी 14 एप्रिलला होणार निर्णय

Bank Privatisation: 5 सरकारी बँका शॉर्टलिस्ट, दोन बँकाच्या खाजगीकरणाविषयी 14 एप्रिलला होणार निर्णय

Bank Privatisation: सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये दोन सार्वजनिक बँकांचं (PSB) खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्यात नीती आयोग (NITI Ayog), आरबीआय (RBI) आणि अर्थ मंत्रालयाचे (Finance ministry) आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आहे. ही बैठक 14 एप्रिल रोजी होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10  एप्रिल: सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये दोन सार्वजनिक बँकांचं (PSB) खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्यात नीती आयोग (NITI Ayog), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि अर्थ मंत्रालयाचे (Finance ministry) आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आहे. ही बैठक 14 एप्रिल रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये खाजगीकरण होणाऱ्या संभाव्य बँकांबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चार ते पाच PSB ची शिफारस नीती आयोगाकडून करण्यात आली आहे आणि या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल खाजगीकरणाच्या यादीत कोणत्या बँका? बिझनेस स्टँडर्डच्या अहवालाच्या मते, नीती आयोगाने 4-5 बँकांची शिफारस केली आहे.  अशीही माहिती मिळते आहे की, या बैठकीत या दोन बँकांचे नाव निश्चित केले जाईल. खाजगीकरणाच्या यादीमध्ये  बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) , इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), सेंट्रल बँक (Central Bank) या बँकांच्या नावाची चर्चा आहे. आतापर्यंत याबाबत कोणताही निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. मात्र या बँकांच्या शेअरमध्ये देखील उसळी पाहायला मिळते आहे. शुक्रवारी NIFTY PSU Banks च्या शेअर्समध्ये जवळपास 3 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. (हे वाचा- अवघ्या 50 हजारात घसबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कराल कोट्यावधीची कमाई ) यादीत नसतील या बँका नीती आयोगाच्या मते स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त ज्या बँकांचे गेल्या काही दिवसांत विलिनीकरण झाले आहे, त्या बँकांचे खाजगीकरण होणार नाही. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. अहवालाच्या आधारे खाजगीकरणाच्या यादीत SBI व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा असणार नाहीत. (हे वाचा- Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 10000 रुपयांची घसरण; वाचा आजचा भाव ) अर्थसंकल्पात झाली होती खाजगीकरणाची घोषणा सरकारने अर्थसंकल्पात (Budget 2021) बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. पुढील आर्थिक वर्षात दोन बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. खासगीकरणाच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक या नावांची चर्चा आहे. खाजगीकरणासाठी अद्याप कोणत्याही बँकेला अंतिम स्वरूप देण्यात आले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एक विमा कंपनीचे खाजगीकरण प्रस्तावित केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात