नवी दिल्ली 09 एप्रिल: तुम्ही नोकरीला (Job) असाल आणि आता नोकरी करून कंटाळला असाल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय (Business Idea) सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ ५० हजार रुपये लागतील. हा बिझनेस आहे ऑनलाईन होर्डिंग्सचा (Digital Hoardings Business). आजच्या या डिजिटलायजेशनच्या युगात ऑनलाईन होर्डिंग्सच्या व्यवसायातून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. यासाठी News18 ने आउटडोर अडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनी गो होर्डिंग्स.कॉम (Gohoardings.com)च्या संस्थापिका दीप्ती अवस्थी शर्मा (Deepti Awasthi Sharma) यांच्याशी संवाद साधला. दीप्ती या ऑनलाईन होर्डींग्सच्या बिझनेसमधून दर महिन्याला १ कोटीपेक्षा जास्त रुपये कमवत आहेत. तर चला दीप्तीकडूनच जाणून घेऊया की ऑनलाईन होर्डिंग्सचा (How to start a hoarding business in India) बिझनेस कसा सुरू करायचा आणि त्यातून किती कमाई करता येईल.
वर्षभरात होणार कोटींची कमाई -
दीप्ती अवस्थी शर्मांनी २०१६ मध्ये ऑनलाईन होर्डिंग्सचा व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा त्या २७ वर्षांच्या होत्या. जास्त पैसे नसल्याने फक्त ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून दीप्ती यांनी ऑनलाईन होर्डिंगचे काम सुरू केलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी १२ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर २० कोटींपेक्षा जास्त झाला. दीप्ती म्हणाल्या, 'मी २०१६ मध्ये अवघ्या ५० हजार रुपयांत डिजीटल होर्डिंग्सचा बिझनेस सुरू केला. ही आयडिया (Idea) यशस्वी ठरली आणि अगदी कमी वेळेत खूप नफा होऊ लागला. मी डिजीटल होर्डिंगच्या व्यवसायाबद्दल थोडा रिसर्च केल्यानंतर मला लक्षात आलं, की हे फील्ड फार अनऑर्गनाईज्ड (UNORGANISED) पद्धतीने काम करते. डिजिटलायजेशनमुळे (digitalization) लोकांना सर्वकाही घरबसल्या पाहिजे त्यामुळे मी हा व्यवसाय करायचं ठरवलं.'
हे काम मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू करता येतं. यासाठी, तुम्हाला तुमच्या डोमेन नावासह एक वेबसाईट तयार करावी लागेल. त्याची स्वत:च जाहिरात करावी लागेल. सुरुवातीला कुठे आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती लोकांना द्यायच्या आहेत, ते पाहून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. लोकांना घरबसल्या जाहिराती बघायच्या असल्याने हा व्यवसाय खूप चालतो.
कशी काम करते दीप्तीची कंपनी -
सर्वात आधी तुम्हाला गो होर्डिंग्ज.कॉम वेबसाईटवर कस्टमरला लॉगिन करावे लागते. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन लोकेशन (जिथं होर्डिंग लावायची आहेत) सर्च करून सिलेक्ट करावं लागेल. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर कंपनीला एक मेल जातो. त्यानंतर कंपनीतर्फे साईट आणि लोकेशन उपलब्धतेचं कन्फर्मेशन पाठवलं जातं. त्यानंतर कस्टमरतर्फे आर्टवर्क आणि ऑर्डर येते. लोकेशन साईटवर लाईव्ह जाण्यासाठी एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. दीप्तीची कंपनी एक महिनाभर होर्डिंग लावण्यासाठी एक लाख रुपये घेते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Career opportunities, Carr, Digital services, Hoarding, Job, Money, Start business