जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 10000 रुपयांची घसरण; काय आहे आजचा भाव?

Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 10000 रुपयांची घसरण; काय आहे आजचा भाव?

Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 10000 रुपयांची घसरण; काय आहे आजचा भाव?

Gold Price Today: सोन्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही जर या लग्नसराईच्या काळात सोनेखरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 एप्रिल:  सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याचे दर (Gold Price Today) उतरले आहेत. जर तुम्ही लग्नसराईच्या या काळात सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchange) वर आज सकाळी पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. याशिवाय चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.1 टक्क्याने घसरून 46,793 प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.4 टक्क्याने घसरून 67,240 प्रति किलो झाले आहेत. आधीच्या दोन सत्रामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 1000 रुपयांनी वाढले होते. गेल्या वर्षीऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर होते. यावेळी सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा झाले होते. आता या रेकॉर्ड स्तरापासून सोन्याचे दर जवळपास 10000 रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर प्रति तोळा 182 रुपयांनी वाढले होते. राजधानी दिल्लीत काय आहे सोन्याचा आजचा भाव? » 22 कॅरेट: 45160 रुपये प्रति तोळा » 24 कॅरेट: 49260 रुपये प्रति तोळा » चांदीचा भाव: 67500 रुपये प्रति किलो (हे वाचा- RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही,सामान्यांवर काय होणार परिणाम ) आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे परिस्थिती? (Gold Rates in International Market) शुक्रवारी अमेरिकेत स्पॉट गोल्डची किंमत 1,755.91 डॉलर प्रति औंस किंमतीवर स्थीर राहिली होती. तर अन्य धातूंमध्ये चांदीची किंमत 25.45 डॉलरवर स्थीर आहे तर प्लॅटिनमचे दर 0.3 टक्क्यांनी कमी होऊन 1,225.95 डॉलर  झाले आहेत. कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात