नवी दिल्ली, 15 जानेवारी: देशभरातील अनेक नागरिकांचं स्वप्न असणारं अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर निर्माणाधीन आहे. आज या मंदिर निर्माणातील महत्त्वाच्या अभियानास सुरुवात झाली आहे ते म्हणजे देणगी अभियान. देशभरातील नागरिकांकडून याकरता देणगी जमा केली जात आहे. दरम्यान काही महत्त्वाच्या नेतेमंडळींनी देखील मोठी रक्कम या मंदिराच्या निर्माणासाठी देऊ केली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी शुक्रवारी 5,00,100 रुपयांचे योगदान दिले. राम मंदिर निर्मितीसाठी निधी समर्पण अभियान शुक्रवारी सुरू झाले आहे. या मोहिमेमध्ये राष्ट्रपती कोविंद यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी राम मंदिरासाठी 5 लाख रुपयांचे अनुदान दिले. (हे वाचा- भाजप आमदाराने वाचवला होता जीव, ‘त्या’ दिवशी मायावतींसाठी देवदूत ठरली होती ही व्यक्ती ) राम मंदिर बांधकाम लवकरात लवकर पूर्ण केले जावे या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि विहिंप आघाडीवर होेतें. दरम्यान देशातील विविध भागातून ट्रस्टने मंदिर बांधण्यासाठी निधी जमा करण्यास सुरवात केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की आम्ही या अभियानाची सुरुवात करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे गेलो. यासाठी त्यांनी 5,00,100 रुपयांची देणगी दिली आणि या अभियानाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील निर्माणाधीन राम मंदिरासाठी 1 लाखांची देणगी दिली आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी चौहान यांनी एक लाख रुपयांचा धनादेश VHP कडे सोपवला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष कोविंद यांची भेट ही या निधी उभारणीच्या अभियानाचाच एक भाग आहे. दरम्यान आलोक कुमार यांनी एचटीला अशी माहिती दिली आहे की, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी 20,000 पेक्षा जास्त निधी चेकद्वारे जमा केला जाईल. (हे वाचा- Indian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका…’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा! ) दरम्यान राम मंदिराच्या उभारणीसाठी जो निधी उभा केला जात आहे, त्याकरता संकलन अभियान 52,50,00 गावात राबवण्यात येणार आहे. गोळा केलेला निधी 48 तासांच्या आत बँकांमध्ये जमा करावा लागेल. संग्रह मोहीम 15 जानेवारीपासून सुरू झाली असून ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत असेल. अलीकडेच राम मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले हो की, राम मंदिर निधी समर्पण अभियान जनतेकडून स्वेच्छेने मंदिर बांधण्यासाठी समर्पित भावाने दान घेतले जाईल. ही योजना भारतातील 500 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा व्हीएचपीचा मानस आहे.