मराठी बातम्या /बातम्या /मनी /महिलेने संकटात शोधली संधी! कोरोनात नोकरी गेल्याने सुरु केला कुरकुऱ्याचा उद्योग, आता...

महिलेने संकटात शोधली संधी! कोरोनात नोकरी गेल्याने सुरु केला कुरकुऱ्याचा उद्योग, आता...

महिलेने उभारला कुरकुऱ्यांचा बिझनेस

महिलेने उभारला कुरकुऱ्यांचा बिझनेस

कविता यांनी सांगितले की, 10 मार्केटिंग एजंट्सच्या मदतीने बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कुरकुऱ्यांसह लहान मुलांचे खाण्याचे बिस्किट आणि इतर पदार्थांसह सुमारे 20 ते 25 लाखांची विक्री केली जाते.

  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India

बेगुसराय, नीरज कुमार : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. यामधील बऱ्याच लोकांनी संकटातही संधी शोधली. आज आपण बेगुसराय येथील अशाच एका महिलेविषयी जाणून घेणार आहे. जिने आपल्या मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर स्वतःचे नशीब स्वतः लिहिले आहे. कविता नावाच्या या महिलेने स्वावलंबी होऊन इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. लॉकडाऊनमध्ये पतीने नोकरी गमावली. यानंतर कविता आपल्या कुटुंबासह गावी परतल्या आणि कमाईसाठी आपण परत राज्यात कधीही जाणार नाही असा संकल्प केला. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज घेऊन त्यांनी स्वत:चा नमकीन उद्योग उभा केलाय.

महिलांनी रियल एस्टेटमध्ये गुंतवणूक करणं खरचं फायद्याचं? काय सांगतात नियम?

5 लाखांचे कर्ज घेतले अन् उभारला उद्योग

बेगुसराय जिल्ह्यातील चेरिया बरियारपूर ब्लॉकमधील खानजहाँपूर येथील रहिवासी कविता देवी लखनऊमध्ये पतीसोबत पॅकिंग कंपनीत काम करत होत्या. लॉकडाऊननंतर कंपनीने पगार बंद केले. कमाईचे साधन बंद झालं आणि त्यांना घरी यावे लागले. अशा वेळी कविताने ठरवले की आता आपण पैसे कमावण्यासाठी बाहेर शहरांमध्ये जाणार नाही. जे काम करता येईल ते आपल्या गावातच करणार. लॉकडाऊन संपल्यानंतर कविता यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून 5 लाखांचे कर्ज घेतले. या कर्जातून त्यांना स्वतःचा कुरकुरे उद्योग उभारला. आता कविता या कुरकुरे आणि लहान मुलांचे इतर खाद्यपदार्थ तयार करतात.

दर महिन्याला होते 20 ते 25 लाख कुरकुऱ्यांची विक्री

कविता यांनी न्यूज 18 लोकलसोबत बोलताना सांगितले की, 10 मार्केटिंग एजंट्सच्या मदतीने बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कुरकुरे आणि लहान मुलांचे खाण्याचे पदार्थ तसंच बिस्किटांसह सुमारे 20 ते 25 लाखांची विक्री केली जाते. कविता यांच्यासोबत पाच मजूर काम करत आहेत. येथे काम करणारे अंकित कुमार आणि असीम आनंद या मजुरांनी सांगितले की, पूर्वी ते बाहेरगावी काम करायचे. पण त्यांना गावातच बाहेरपेक्षा जास्त पगार मिळू लागला आहे. हे काम करून धर्मो हे 17 हजारांची कमाई करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Business, Business News