जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! कोरोनामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2000 रुपये

खूशखबर! कोरोनामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2000 रुपये

खूशखबर! कोरोनामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2000 रुपये

सरकारकडून 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. लवकरच 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 2 हजाराची रक्कम जमा होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरसमुळे (Corornavirus) संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत व्हावी याकरता त्यांच्या खात्यात याच आठवड्यात 2000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. लवकरच 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 2 हजाराची रक्कम जमा होणार आहे. (हे वाचा- आजपासून बदलणार Income Tax संदर्भातील हे नियम,जाणून घ्या काय होणार परिणाम) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यासंदर्भात माहिती दिली. गरीब आणि शेतकऱ्यांवर ताण पडू नये यासाठी सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केल्याचं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून (DBT) 1600 कोटी रक्कम एका दिवसात ट्रान्सफर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत देशातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या शेतकरी कुटुंबांना एकूण 18 हजार कोटींची मदत याच आठवड्यात मिळणार आहे. (हे वाचा- सामान्यांसाठी आनंदाची बातमी, आजपासून स्वयंपाक बनवणं आणि गाडी चालवणं झालं स्वस्त ) देशात जवळपास 14.5 कोटी शेतकरी आहेत, मात्र अद्याप सर्वांची नोंदणी या योजनेअंतर्गत झालेली नाही. लॉकडाऊननंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या आर्थिक पॅकेजसंदर्भात माहिती दिली होती. पैसे मिळाले नाही तर काय कराल? जर तुम्हाला या पहिल्या आठवड्यात पैसे नाही मिळाले तर लेखापाल आणि कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करा. त्यातूनही तुमचं काम पूर्ण झाले नाही, तर केंद्रीय कृषि मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या टोल फ्री असणाऱ्या PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 या हेल्पलाइनवर संपर्क करा. त्याचप्रमाणे मंत्रालयाचा दुसरा नंबर 011-23381092 याठिकाणीही तुम्ही संपर्क करू शकता. या योजनेतील दुसरा टप्पा सुरू झाला असून त्याअंतर्गत 3.5 कोटी शेतकऱ्यांना त्यांचा हफ्ता मिळाला आहे. या शेतकऱ्यांना नाही मिळणार योजनेचा लाभ -असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानीक पदावर आहेत, माजी किंवा सध्या मंत्री, महापौर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा किंवा राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा समावेश ते शेती करत असले तरी या योजनेत केला जात नाही. (हे वाचा- महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांसाठी खूशखबर! घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घसरण ) -केंद्रात किंवा राज्य सरकारमध्ये अधिकारी त्याचप्रमाणे 10 हजारांहून अधिक पेन्शन घेणारे कर्मचारी -डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील, आर्किटेक्ट यापैकी कुणी शेती करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात