• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • आजपासून बदलणार Income Tax संदर्भातील हे 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

आजपासून बदलणार Income Tax संदर्भातील हे 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणामुळे सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. तसंच 2020 च्या अर्थसंकल्पात इनकम टॅक्सच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. जाणून घेऊयात हे नेमके काय बदल आहेत

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 एप्रिल : आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2020-21 ची सुरूवात होत आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणामुळे सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. सरकारने 2018-19 या वर्षासाठीचा इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Returns) भरण्याची डेडलाइन वाढवली आहे. त्याचप्रमाणे पॅन आणि आधार (PAN-Aadhar) लिंक करण्याची तारीखही 3 महिन्यांनी वाढवून 30 जून केली आहे. 2020 च्या अर्थसंकल्पात (Budget 2020) मध्ये इनकम टॅक्सच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. जाणून घेऊयात हे नेमके काय बदल आहेत. नवीन करप्रणाली (Income Tax New Systems) केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020-21) केंद्र सरकारने पर्यायी दर आणि टॅक्स स्लॅबसह नवीन आयकर प्रणाली (New Income Tax Regime) लागू केली आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  नवीन कर प्रणाली वैकल्पिक आहे म्हणजेच जर करदाता इच्छुक असेल तर तो जुन्या कर स्लॅबनुसार प्राप्तिकर भरू शकतो. (हे वाचा-आजपासून बदलणार GST आणि आयकरसंबधातील नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम) त्याचबरोबर नव्या करप्रणालीअंतर्गत वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्याना कोणताही कर भरावा लागणार नाही. 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर 10 %, 7.5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी 15%, 10 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 % , वार्षिक 15 लाख रुपये वार्षिक उत्पन असणाऱ्यांंसाठी 25 % तर, 15 लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 % कर द्यावा लागेल. डिव्हिडंट डिस्ट्रिब्युशन टॅक्स केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये कंपन्या आणि म्युच्यूअल फंड्सकडून देण्यात येणाऱ्या डिव्हिडंटवर DDT रद्द करण्यात आला आहे. आता हा टॅक्स ज्यांना डिव्हिडंट मिळतो त्यांना द्यावा लागेल. जर तुम्हाला म्युच्यूअल फंडमधून डिव्हिडंट मिळत असेल, तर ही तुमची कमाई मानण्यात येईल. त्यावर टॅक्स स्लॅबच्या हिशोबाने टॅक्स भरावा लागेल. EPF, NPS मध्ये 7.5 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक टॅक्स स्लॅबमध्ये येणार जर NPS आणि EPF  मध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन वर्षाला 7.5 लाखापेक्षा जास्त असेल तर कर्मचाऱ्याला यावर निश्चित कर भरावा लागेल. आयकरमधील जुन्या आणि नवीन करप्रणालीमध्ये हा बदल लागू करण्यात आला आहे. गृहकर्जाच्या व्याजावर पुढील वर्षापर्यंत मिळणार टॅक्स बेनिफिट सरकारने गृहकर्जावरील व्याजावर करामध्ये मिळणाऱ्या सवलतीचा कालावधी वाढवला आहे. आता 31 मार्च 2021 पर्यंत याचा फायदा होईल. गृहकर्जावरील व्याजावर 3.5 रुपयापर्यंत करामध्ये सूट देण्यात आली आहे. (हे वाचा-महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांसाठी खूशखबर! घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घसरण) पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी हे फायद्याचे आहे. जर 31 मार्च 2021 आधी 45 लाखाचं कर्ज घर खरेदी करण्यासाठी घेतलं असेल, तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. स्टार्टअप्सना दिलासा अर्थसंकल्पात स्टार्टअपच्या ESOP वर टॅक्सचे नियम सोपे करण्यात आले आहेत. आता ESOP वर 5 वर्षानंतर कर आकारण्यात येईल. आतापर्यंत स्टार्टअपच्या ESOP वरून अनेक समस्या येत होत्या. केवळ 200 अर्ली स्टेज स्टार्टअप्सना ESOP योजनेचा फायदा मिळतो आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: