महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांसाठी खूशखबर! घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या काय आहेत दर

महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांसाठी खूशखबर! घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या काय आहेत दर

देशातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी सामान्य नागरिकाच्या खिशावरील ओझं कमी होईल, असा महत्वाचा निर्णय घेतला आहे. घरगुती ग‌ॅसच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली असून नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसाठी खूशखबर आहे. देशातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी सामान्य नागरिकाच्या खिशावरील ओझं कमी होईल, असा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL,BPCL, IOC) सबसिडी नसणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 14.2 किलोचे सबसिडी नसणाऱ्या एएनपीजी सिलेंडरच्या किंमती मुंबईमध्ये 62 रुपयांनी कमी होत 714 रुपयांवर पोहोचल्या आहेत. सरकारने 31 मार्च रोजी देशामधील उत्पादित नॅचरल गॅस (Natural Gas) च्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या किंमतीमध्ये 26 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

(हे वाचा-आजपासून बदलणार GST आणि आयकरसंबधातील नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)

नॅचरल गॅसच्या किंमतीमध्ये कपात केल्यामुळे सीएनजी (CNG), पाईपलाइनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणारा गॅस (PNG) यांच्या सुद्धा किंमती कमी होतील. मात्र यामुळे ONCG सारख्या उत्पादन कंपन्यांच्या महसूलामध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता येणार आहे.

जाणून घ्या किंमतीमध्ये किती बदल झाला आहे (LPG Price in india 01 April 2020)

IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या किंमतींप्रमाणे 14.2 किलोचे सबसिडी नसणाऱ्या एएनपीजी सिलेंडरच्या किंमती मुंबईमध्ये 62 रुपयांनी कमी होत 714 रुपयांवर तर 19 किलो घरगुती सिलेंडरची मुंबईतील किंमत 1234.50 रुपये झाली आहे. इतर मेट्रो शहरांधील किंमत पुढील प्रमाणे-

दिल्ली: 14.2 किलो-744.50 रु. आणि 19 किलो- 1285.50 रु.

कोलकाता: 14.2 किलो-774.50 रु. आणि 19 किलो- 1348.50 रु.

चेन्नई: 14.2 किलो-761.50 रु. आणि 19 किलो- 1402 रु.

First published: April 1, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading