सामान्यांसाठी आनंदाची बातमी, आजपासून स्वयंपाक बनवणं आणि गाडी चालवणं झालं स्वस्त

नवीन आर्थिक वर्ष (Financial Year 2020-21) सुरू होताच देशामध्ये CNG-PNG च्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावरील भार कमी होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 एप्रिल : नवीन आर्थिक वर्ष (Financial Year 2020-21) सुरू होताच देशामध्ये CNG-PNG च्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. सरकारने देशातील नैसर्गित वायू (Natural Gas)चे विक्री मूल्य 26 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 मध्ये सादर करण्यात आलेल्या घरगुती गॅस किंमत नियमाअंतर्गत, आजपासून निश्चित झालेली किंमत सर्वात कमी आहे. भारताने घरगुती गॅसची किंमत प्रति दहा लाख ब्रिटिश थर्मल यूनिटसाठी 2.39 डॉलर केली आहे. नैसर्गिक वायूची किंमत कमी झाल्यामुळे सीएनजी (CNG), पाईपलाइनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणारा गॅस (PNG) यांच्या सुद्धा किंमती कमी होतील. मात्र यामुळे ONCG सारख्या उत्पादन कंपन्यांच्या महसूलामध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता येणार आहे.

(हे वाचा-महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांसाठी खूशखबर! घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घसरण)

पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियोजन व विश्लेषण कक्षाने (PPC) दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गित वायूची किंमत 1 एप्रिलपासून सहा महिन्यांसाठी म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत प्रति दहा लाख ब्रिटिश थर्मल यूनिटसाठी 2.39 डॉलर केली आहे. याआधी हि किंमत 3.23 डॉलर प्रति दहा लाख ब्रिटिश थर्मल यूनिट एवढी होती. 2014 नंतर ही सहा महिन्यातील ही दुसरी मोठी घसरण आहे.

1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला ठरतात नवे दर

त्याचप्रमाणे समुद्री क्षेत्रातून येणाऱ्या गॅसची किंमत सुद्धा 8.43 एमबीटीयू वरून 5.61 डॉलरवर आली आहे. नैसर्गिक वायूची किंमत दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला निश्चित करण्यात येतात. वीज उत्पादनासाठी या गॅसचा वापर केला जातो. वाहन इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या सीएनजीसाठी सुद्धा नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. घराघरात पाईपलाइनद्वारे पोहोचणाऱ्या पीएनजीमध्ये देखील याचा वापर होतो.

कमी होऊ शकते ONGC ची कमाई 

नैसर्गिक गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे त्यांच्या उत्पादन कंपन्यांच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. देशामध्ये नैसर्गिक गॅसची ONGC ही सगळ्यात मोठी उत्पादक कंपनी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नैसर्गिक वायूची किंमत कमी झाल्यामुळे ओएनजीसीची कमाई 3000 कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्री आणि त्यांची भागीदार कंपनी बीपी पीएलसी  यांची कमाई सुद्धा घटू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2020 02:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading