मुंबई, 25 जानेवारी: करोडपती बनणं प्रत्येकाची इच्छा असते, पण योग्य प्लॅनिंग नसल्यानं अडचणी येतात. करोडपती बनणं फार कठीण नाही, यासाठी फक्त संयम व योग्य नियोजनाची आवश्यकता असते. आज आम्ही तुम्हाला असा एक फॉर्म्युला सांगणार आहोत, जो तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी उपयोगी ठरेल. हा फॉर्म्युला म्हणजे ‘पॉवर ऑफ कंपाउंडिंग’ अर्थात चक्रवाढ व्याजाचा! ‘एनडीटीव्ही इंडिया’ने याबाबत वृत्त दिलंय.
पॉवर ऑफ कंपाउंडिंगमुळे व्यक्ती करोडपती बनते, ज्याला अल्बर्ट आईन्स्टाईननं एक आश्चर्य म्हटलं होतं. अल्बर्ट आईन्स्टाईनचं नाव जवळपास सर्वांनी ऐकलं आहे. अल्बर्ट आइनस्टाईन नाव घेतलं की, सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते नोबेल पारितोषिक, वैज्ञानिक, आविष्कार इत्यादी शब्द. 14 मार्च 1879 रोजी जर्मनीत जन्मलेल्या अल्बर्ट यांनी भौतिकशास्त्राशी संबंधित नियम मांडले. पण, या शास्त्रज्ञानेही पॉवर ऑफ कंपाउंडिंग हा व्यवसाय आणि पैसा कमावण्याच्या जगातला सर्वात शक्तिशाली मंत्र समजून घेतला आणि स्वीकारला. अल्बर्ट यांनी पॉवर ऑफ कंपाउंडिंगला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं होतं.
यंदाच्या बजेटमध्ये Income Tax लिमिट वाढणार? नोकरदार वर्गाला ‘या’ आहेत अपेक्षा
अल्बर्ट यांचा मेंदू हे जगातील आश्चर्य मानलं जातं. त्यांच्या बुद्धिमतेवर लोकांचा विश्वास बसत नव्हता. त्यांचं वागणं, ज्ञान, धर्म आणि समाजाचं आकलन उच्च दर्जाचं होतं. जे त्या काळात समजणं आणि आत्मसात करणं शक्य नव्हतं. त्यामुळे अल्बर्ट यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेम केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना न सांगता आणि त्यांची संमती न घेता, अल्बर्ट यांचा मेंदू बाहेर काढला होता. तो मेंदू एक आश्चर्य होता. अशा प्रचंड बुद्धिमान असणाऱ्या अल्बर्ट यांनी कंपाउंडिंगची शक्ती समजून घेतली होती, आणि लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला होता.
पॉवर ऑफ कंपाउंडिंगबद्दल अल्बर्ट म्हणाले होते की, ‘हे जगातील आठवं आश्चर्य आहे. ज्याला पॉवर ऑफ कंपाउंडिंग माहीत आहे, तो पैसे कमवतो, आणि ज्याला माहीत नाही, तो पैसे गमवतो.’ अल्बर्ट यांच्या या विधानाबद्दल काही लोक शंका घेतात, आणि त्यांना अल्बर्ट यांनी असं विधान केल्याचं मान्य नाही. पण व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या विश्वात अल्बर्ट यांनी असं विधान केलं होतं, हे सांगितलं जातं.
नवा व्यवसाय सुरु करायचाय? 'हे' लायसन्स घेऊन सुरु करा तुमची कंपनी
खरं तर व्यवसाय, गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे विश्वदेखील हा मंत्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन भविष्याच्या मार्गावर वाटचाल करीत असते. हे असं सूत्र आहे की, जर एखाद्याला वयाच्या 15-20 व्या वर्षी समजलं, तर तो वयाच्या 40 व्या वर्षी आर्थिक स्वावलंबी झालेला असतो. त्या पुढील त्याचं उर्वरित आयुष्य तो कोणत्याही आर्थिक काळजीशिवाय जगू शकेल, याची खात्री असते.
पॉवर ऑफ कंपाउंडिंग हे साध्या व्याज प्रणालीपेक्षा कसं चांगले आहे, ते आम्ही तुम्हाला उदाहरणासह समजावून सांगू. समजा, 15 टक्के वार्षिक व्याज दर आहे आणि तो 35 वर्षांसाठी लागू आहे. अशावेळी एक लाख रुपये गुंतवणूक केलेल्या व्यक्तीला साध्या व्याजप्रणालीवर 35 वर्षांनंतर 6,25,000 रुपये मिळतील. त्याच कालावधीसाठी पॉवर ऑफ कपाउंडिंगने तितकेच पैसे गुंतवले असतील, तर तुम्ही अंदाज लावू शकता का किती पैसे मिळतील? अशावेळी 35 वर्षानंतर गुंतवणूकदाराला तब्बल 1,33,17,552.34 रुपये परत मिळतील. हे दोन्ही आकडे खूप काही सांगून जातात. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फॉर्म्युला जास्त काळ गुंतवणूक केल्यावरच फायद्याचा ठरतो. कारण सुरुवातीच्या 5-10 वर्षांमध्ये तुम्हाला फारसा फरक दिसणार नाही. पण नंतरच्या वर्षांत फरक इतका वाढतो की तो चमत्कारापेक्षा कमी नाही. .
दरम्यान, ज्यांना पैसे कमवायचे आणि वाढवायचे आहेत, त्यांनी हा फॉर्म्युला जाणून घेतला पाहिजे. पॉवर ऑफ कपाउंडिगशिवाय कोणताही माणूस साध्या स्थितीतून करोडपती होऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News