मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नवा व्यवसाय सुरु करायचाय? 'हे' लायसन्स घेऊन सुरु करा तुमची कंपनी

नवा व्यवसाय सुरु करायचाय? 'हे' लायसन्स घेऊन सुरु करा तुमची कंपनी

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स

तुम्हाला तुमची नोकरी जाण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला काही लायसन्सची माहिती देत ​​आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Mohini Vaishnav

मुंबई, 25 जानेवारी: देशात आणि जगात आर्थिक मंदीचा परिणाम दिसू लागला आहे. जगातील मोठ्या-मोठ्या कंपन्या या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकऱ्यांमधून काढून टाकत आहेत. अचानक नोकरी गेल्याने अनेक प्रकारच्या समस्या समोर येत आहेत. याच कारणामुळे काही लोक हे नव्या नोकरीच्या शोधात आहेत. काही बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकत नाहीत. त्यामुळे या लोकांना अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक जण हे स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा विचार करतात. मात्र सुरुवात कशी करावी हे त्यांना माहिती नसते. मात्र नोकरी गेली आणि नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशा काही लायसन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये देखील कमावू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही सरकारच्या योजनांविषयी....

हे 10 लायसेंस बदलतील तुमचे नशीब

सरकारच्या मदतीने तुम्हाला मिळणारे हे 10 लायसेंस घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा कंपनी सुरू करू शकता. 2022 आणि 2023 या वर्षात लाखो कर्मचाऱ्यांना भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर नोकरीवरुन काढून टाकले जात आहे. कर्मचारी त्यांच्या आयुष्यातील अगणित तास कंपनीला देतात, मात्र त्याच कंपन्या एक दिवस कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकतात. बहुतेक कर्मचार्‍यांचे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न असते, परंतु हे स्वप्न मोजक्याच लोकांना पूर्ण करता येते. आज आम्‍ही तुम्‍हाला 10 लायसन्‍सविषयी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला भारतात व्यवसाय सुरु करता येऊ शकेल.

या वर्षी श्रीमंत व्हायचेय? मग लगेच करा या 6 गोष्टी, व्हाल मालामाल 

हे आहेत 10 लायसेंस

कंपनी नोंदणी-: भारतातील सर्व व्यवसायांना 2013 च्या कंपनी कायदा अंतर्गत नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. यामध्ये स्थायी खाते क्रमांक (PAN) आणि कर कपात आणि संकलन खाते (TAN) क्रमांकासाठी नोंदणी करावी लागते. ज्यानंतर तुम्ही स्वतःची कंपनी बनवू शकता.

GST नोंदणी: जर तुमच्या व्यवसायाची उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला वस्तू आणि सेवा कर (GST) साठी सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

FSSAI लायसेंस : जर तुम्ही अन्नाशी संबंधित काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) चे लायसेंस घ्यावे लागेल.

घरात किती कॅश ठेवणे योग्य? काय आहे लिमिट? जाणून घ्या Income Tax विभागाचे नियम

दुकान नोंदणी: सर्व व्यावसायिकांनी ते ज्या राज्यात आहेत त्या संबंधित राज्याच्या दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.

व्यावसायिक कर नोंदणी: राज्य आणि व्यवसायाच्या प्रकृतीच्या आधारावर, प्रोफेशनल टॅक्स रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. हा व्यक्तींवर त्यांच्या उपजीविकेसाठी किंवा व्यवसायासाठी लादलेला कर आहे.

आयात-निर्यात कोड (IEC): जर तुम्ही वस्तू आयात किंवा निर्यात करण्याची योजना आखत असाल (आयात-निर्यात कोड), तुम्हाला IEC प्राप्त करणे आवश्यक आहे.

औद्योगिक लायसेंस : व्यवसायाचे स्वरूप आणि उद्योगाच्या प्रकारानुसार, औद्योगिक परवाना आवश्यक आहे.

पर्यावरणीय मंजुरी: जर तुमचा व्यवसाय खाणकाम, उर्जा किंवा उत्पादन यासारख्या विशिष्ट उद्योगांतर्गत येत असेल, तर तुम्हाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी घेणे आवश्यक आहे.

FSDC नोंदणी : तुमचा व्यवसाय आर्थिक क्षेत्रात सामिल असल्यास, तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्थानिक प्राधिकरणांकडून एनओसी आणि मंजुरी : तुमच्या व्यवसायाच्या स्थानावर अवलंबून, तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्रे प्राप्त करणे आवश्यक असू शकते. यामध्ये तुम्हाला पालिका, अग्निशमन विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासारख्या स्थानिक प्राधिकरणांची परवानगी घ्यावी लागेल.

First published:

Tags: Business, Business News, Startup