मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office च्या स्कीममध्ये 5 वर्षात 15 लाखांचे मिळतील 21 लाख, वाचा सविस्तर

Post Office च्या स्कीममध्ये 5 वर्षात 15 लाखांचे मिळतील 21 लाख, वाचा सविस्तर

Earn money: तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस (Post Office) छोट्या बचत योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. जाणून घ्या अशाच एका योजनेबद्दल

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 जुलै: तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस (Post Office) छोट्या बचत योजना (Small Saving Scheme) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.  पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्य बँकेतील एफडी (Fixed Deposit) किंवा आरडीपेक्षा चांगला रिटर्न मिळतो आहे. पोस्टाची ही योजना उत्तम पर्याय ठरेल कारण यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतील. यामध्ये सरकारी गॅरंटी देखील मिळेल, जाणून घ्या काय आहे ही योजना

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम (NSC)

पोस्ट ऑफिसच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) ही एक आहे. याठिकाणी तुम्हाला एफडीच्या तुलनेत अधिक व्याज मिळेल. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीमसाठी तुम्हाला 6.8 टक्के दराने व्याज मिळेल. हे वार्षिक आधारे कंपाउंड केले जाते मात्र त्याचे पेमेंट मॅच्युरिटीवरच मिळते. या स्कीमचा टेन्योर पाच वर्षांचा आहे. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतरही ही स्कीम पाच वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते.

हे वाचा-ही स्टार सीरिजची नोट खरी आहे की बनावट? विक्री केल्यास मिळेल इतकी किंमत

गुंतवणुकीसाठी 5 पर्याय

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आता 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयांच्या मुल्यामध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या किंमतीचे कितीही सर्टिफिकेट तुम्हाला खरेदी करता येतील. यामध्ये कमीतकमी गुंतवणूक 100 रुपयांची आहे, जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.

हे वाचा-SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! बँक घरपोच करणार 20000 रुपये, वाचा सविस्तर

कशाप्रकारे मिळतील 15 लाख गुंतवून 21 लाख

जर तुम्ही या योजनेमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 6.8  टक्के व्याजदराच्या हिशोबाने 5 वर्षात याचे 20.85 लाख होतील. यामध्ये तुमची गुंतवणूक 15 लाखांची असेल मात्र व्याज स्वरुपात तुम्हाला 6 लाखांचा अतिरिक्त फायदा होईल. इन्कम टॅक्स कायदा 1961 मधील सेक्शन 80C अंतर्गत NSC मध्ये 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळेल.

First published:

Tags: Post office, Post office bank, Post office customers, Post office saving, Savings and investments