मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्याकडे ही स्टार सीरिजची नोट असल्यास ती खरी आहे की बनावट? विक्री केल्यास मिळेल इतकी किंमत

तुमच्याकडे ही स्टार सीरिजची नोट असल्यास ती खरी आहे की बनावट? विक्री केल्यास मिळेल इतकी किंमत

500 रुपयांच्या अशा काही नोटा समोर आल्या आहेत ज्यामध्ये नोटेवरील क्रमांकावर मध्ये स्टार '*' (Star Series Currency Notes) आहे. अशावेळी अनेकांना असा प्रश्न पडतो आहे की ही नोट खरी आहे की बनावट (Fake Notes)?

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 जुलै: भारत सरकारने (Indian Government) अनेक नोटा आणि नाणी चलनातून रद्द केल्या आहेत. नवीन नोटांची छपाई जारी आहे. दरम्यान 500 रुपयांच्या अशा काही नोटा समोर आल्या आहेत ज्यामध्ये नोटेवरील क्रमांकावर मध्ये स्टार '*' (Star Series Currency Notes) आहे. अशावेळी अनेकांना असा प्रश्न पडतो आहे की ही नोट खरी आहे की बनावट (Fake Notes)? स्टार सीरिजच्या नोटा अनेकांकडे गेल्या आहेत. दरम्यान या नोटा पूर्णपणे वैध (Real Currency) आहेत. या खास नोटा तुम्हाला त्याच्या मुल्यापेक्षा अधिक किंमत मिळवून देऊ शकतात. कारण ऑनलाइन केवळ जुन्या नाही तर काही खास सीरिजच्या नोटांचा लिलाव केला जातो. त्यातून तुम्ही घरबसल्या (earn money from home) 5 लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता.

आजकाल काही वेबसाइट्स अँटिक नाणी आणि नोटांचा लिलाव करतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही नोटेसंदर्भात सांगणार आहोत. तुमच्याकडे अशी खास नोट असेल तर तुम्ही तिचा लिलाव करू शकता. याकरता तुम्ही अशा 1, 2, 10, 100, 500, 2000, 200

रुपयांच्या नोटा शोधा. अशी एखादी खास नोट तुम्हाला पाच लाख रुपये मिळवून देऊ शकते. ऑनलाइन लिलावामध्ये 500 रुपयाच्या स्टार सीरिजच्या नोटेला विशेष मागणी आहे. याकरता तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते.

हे वाचा-या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, वाढीव DA सह 300 सुट्ट्या मिळण्याची शक्यता

कुठे होईल विक्री?

तुम्ही advertisement platform असणाऱ्या क्विकर (Quikr) वर ही नोट ऑनलाइन विकू शकता. या वेबसाइटवर स्टार सीरिजच्या नोटेकरता मोठी रक्कम मिळते आहे. याशिवाय ईबे इंडिया (Ebay India) किंवा क्लिक इंडिया (Click India) सारख्या वेबसाइट देखील दुर्मीळ नोटांचा लिलाव करतात. याठिकाणी देखील अशा दुर्मीळ नाणी-नोटांची विक्री तुम्हाला करता येईल.

अशाप्रकारे करा ऑनलाइन विक्री

- ज्या वेबसाइटवर तुम्हाला विक्री करायची आहे त्याठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि स्वतःची विक्रेता म्हणून नोंदणी करा.

- तुमच्याकडे ज्या नोटा आहेत त्यांचे फोटो काढून ते या साईटवर अपलोड करा.

हे वाचा-SBI ALERT! हे काम केलं नाहीत तर 10000 रुपये दंड भरण्यासाठी राहा तयार

-त्यानंतर तुमचा पत्ता, मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी प्रविष्ट करा

-वेबसाइटकडून तुम्ही दिलेली माहिती व्हेरिफाय केली जाईल

- यानंतर वेबसाइटकडून तुमच्याशी संपर्क केला जाईल. तुम्ही त्यांच्याशी बोलणी करून व्यवहार करू शकता.

(डिस्क्लेमर- ही बातमी विविध वेबसाइट्सवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आली आहे, News18 लोकमतकडून याबाबत पुष्टी करण्यात येत नाही आहे.)

First published:

Tags: Money