नवी दिल्ली, 18 जुलै: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेकडून ग्राहकांना नेहमी विविध सुविधा देण्यात येतात. बँकेने कोरोना संकटकाळात (Coronavirus Pandemic) ग्राहकांसाठी डोअरस्टेप बँकिंगची (SBI Doorstep Banking) सुरुवात केली आहे. याअंतर्गत देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) तुमचे खाते असेल तर बँक तुम्हाला घरबसल्या पैसे काढण्याची आणि जमा करण्याची सुविधा देत आहेत. शिवाय तुम्हाला पे ऑर्डर्स, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक रिक्वेझेशन स्लीप संबंधित अनेक सुविधा मिळतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डोअरस्टेप बँकिंग सुविधेअंतर्गत ट्रान्झॅक्शनची मर्यादा कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 20000 रुपये आहे. कॅश विड्रॉलसाठी रिक्वेस्ट करण्याआधी तुमच्या खात्यात पर्याप्त रक्कम आहे की नाही हे तपासून घ्या, अन्यथा तुमचं ट्रान्झॅक्शन रद्द होऊ शकतं.
हे वाचा-SBI ग्राहकांसाठी आवश्यक बातमी! तुम्ही YONO APP वापरता का? होणार महत्त्वाचे बदल
एसबीआयने ट्वीट करत दिली माहिती
SBI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या सुविधेबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने असं म्हटलं आहे आता बँक तुमच्या दरवाज्यापर्यंत. या सुविधाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://bank.sbi/dsb या लिंकला भेट देऊ शकता.
आपका बैंक अब आपके दरवाजे पर। Doorstep banking के लिए आज ही रजिस्टर करे। अधिक जानकारी के लिए: https://t.co/m4Od9LFR3G टोल-फ्री नं। 1800 1037 188 या 1800 1213 721#DoorstepBanking #DSB #Banking #StayAtHome #SBIAapkeSaath pic.twitter.com/dPxU3V9CPh
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 18, 2021
डोअरस्टेप बँकिंगबाबत महत्त्वाचे
1. याकरता होम ब्रँचमध्ये नोंदणी करावी लागेल
2. जोपर्यंत कॉन्टॅक्ट सेंटरवर ही सुविधा पूर्ण होत नाही तोवर होम ब्रँचमध्ये याकरता अर्ज करावा लागेल
3. पैसे जमा करणे आणि काढण्याची अधिकाधिक मर्यादा 20000 रुपये आहे
4. सर्व Non-financial transactions व्यवहारांसाठी शुल्क 60 रुपये+जीएसटी आहे तर financial transactions साठी शुल्क 100 रुपये+जीएसटी आहे.
5. पैसे काढण्यासाठी चेक आणि विड्रॉल फॉर्मसह पासबुक आवश्यक आहे
6. जॉइंट अकाउंट, मायनर अकाउंट, नॉन-पर्सनल अकाउंट तसंच ज्या ग्राहकांचा रजिस्टर पत्त होम ब्रँचपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे त्यांना ही सुविधा मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, SBI bank, SBI Bank News, State bank of india