मुंबई, 25 डिसेंबर: बचत आणि गुंतवणूक (Saving and Investment) या दोन्ही बाबी सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office saving schemes) अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे अतिशय सुरक्षित मार्गाने दुप्पट करू शकता. तुम्हीही कमी जोखमीत नफा मिळवून देणारा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या खास योजनांचा विचार करू शकता. यामध्ये तुम्ही कमी जोखीम घेऊन जास्त नफा मिळवू शकता. आज आपण पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेबद्दल बोलत आहोत. भारतीय पोस्टची ग्राम सुरक्षा योजना हा असाच एक पर्याय आहे, ज्यामध्ये कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, बोनससह विमा रक्कम विमाधारक व्यकीत 80 वर्षाची झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारस/नॉमिनीकडे दिली जाते. हे वाचा- 1 रुपयाच्या गुंतवणुकीतून कोट्यवधीचा फायदा, वाचा काय आहे एलआयसीची भन्नाट योजना! कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे का? ग्राम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत कर्जाचीसुविधा देखील मिळते. ही सुविधा पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनी मिळू शकते. ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी त्याचा काही फायदा होणार नाही. या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आहे. हे वाचा- Google ला झटका! भरावा लागणार 9.8 कोटी डॉलरचा दंड, वाचा काय आहे कारण मॅच्युरिटीवर किती मिळतोय फायदा? जर एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा विमा योजना खरेदी केली तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.