मुंबई, 24 डिसेंबर: जगातील दिग्गज मल्टिनॅशनल टेक कंपनी गूगलला मोठ्या कायदेशीर कामगिरीला सामोरं जावं लागत आहे. गूगलला मॉस्को न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बेकायदेशीर कंटेट काढून टाकण्यात वारंवार अपयशी ठरल्याबद्दल मॉस्को न्यायालयाने शुक्रवारी Google ला जबरदस्त मोठा दंड ठोठावला. रशियन अधिकार्यांनी (Russia Fines Google) या कंटेटबाबत गूगलवर दबाव आणला, परंतु त्याचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने दंड ठोठावला. टेलिग्रामवर न्यायालयाच्या प्रेस सर्व्हिसने अशी माहिती दिली की, या यूएस फर्मला 7.2 अब्ज रूबल (9.8 कोटी डॉलर, 86 डॉलर युरो) दंड ठोठावण्यात आला आहे. रशियाने अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांना दंड ठोठावला आहे. या कंपन्यांवर रशियाकडून असा आरोप केला जात आहे की, त्यांच्याकडे असणारी सामग्री योग्यरित्या नियंत्रित केली गेलेली नाही. त्याचप्रमाणे या कंपन्यांकडून देशाच्या कारभारात हस्तक्षेप केला जात आहे. हे वाचा- इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींकडून वारंवार व्हिडीओ कॉल येतोय? ‘अशी’ सूटका मिळवा जरी मेटा (Facebook), ट्विटर, गूगल, (Meta (Facebook), Twitter, Google) आणि इतर परदेशी टेक दिग्गजांना बिलियन्स नाही तर मिलियन्समध्ये दंड ठोठावण्यात आला. इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने सांगितले की, गुगलच्या वार्षिक उत्पन्नाच्या टक्केवारीच्या आधारे दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. हे वाचा- भविष्यातील घरं पाहुन व्हाल अचंबित! इथं भिंतीही तुमच्या हावभावावरुन करतील काम मेटाची देखील यानंतर याच आरोपांवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. या कंपनीला देखील महसूल आधारित दंडाचा इशाराही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.