नवी दिल्ली, 24 मे : पोस्ट ऑफिसमध्ये केलेली जाणारी गुंतवणूक सुरक्षित असते. अनेकदा गुंतवणुकीसोबत रिस्कही असते. परंतु जर तुम्ही चांगल्या आणि सरकारी गुंतवणुकीच्या पर्यायाच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही गुंतवणुकीची स्कीम फायदेशीर ठरू शकते. तसंच या योजनेद्वारे मोठा ंफंडही जमा करता येऊ शकतो.
पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना चांगला पर्याय ठरू शकतात. यात सुरक्षितता असून रिटर्नही चांगला मिळतो. ही गुंतवणुकीची योजना ग्राम सुरक्षा स्कीम
(Gram Suraksha Scheme) आहे. यात योजनेत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच दररोज 50 रुपये जमा करुन मोठा फंड जमा करता येईल. नियमितपणे ही रक्कम जमा केल्यास येणाऱ्या काळात तुम्हाला 31 ते 35 लाखापर्यंतचा फायदा मिळू शकतो.
गुंतवणुकीसाठी काय आहेत नियम -
- 19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
- या योजनेत कमीत-कमी विमा रक्कम 10000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
- या योजनेत प्रीमियम मासिक, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक असू शकतो.
- प्रीमियमचं पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सूट मिळते.
- या स्कीमवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.
- ही स्कीम घेतल्यानंतर तुम्ही 3 वर्षांनंतर ती सरेंडरही करू शकता. पण यात कोणताही फायदा मिळत नाही.
किती होईल फायदा -
समजा 19 व्या वर्षी एखाद्याने या स्कीममध्ये गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशात पॉलिसीधारकाला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्योरिटी बेनिफिट मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.