नवी दिल्ली, 22 मे : म्युचुअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणुकीचा ट्रेंड सध्या वाढतो आहे. दर महिन्याला म्युचुअल फंड आणि SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची आकडेवारीही वाढत आहेत. एफडीवरील (FD) कमी होणाऱ्या रिटर्नमुळे याकडे अनेकांचा कल वाढला आहे. सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंड स्कीम 12 ते 13 टक्के वार्षिक रिटर्न देते. जर एखादी अतिशय चांगली स्कीम असेल, तर हा रिटर्न 15 ते 24 टक्क्यांपर्यंतही पोहोचतो. SIP मध्ये तुम्ही अतिशय कमी पैशातही, लहान गुंतवणूक करुनही मोठा करोडोंचा फंड तयार करू शकता.
12 टक्के रिटर्न -
समजा SIP अंतर्गत तुम्ही दररोज 200 रुपये म्हणजे महिन्याला 6000 रुपये गुंतवणूक करता. जर तुमच्या फंडवर 12 टक्के रिटर्न मिळाल्याचं मानल्यास तुम्ही 21 वर्षात 68.3 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. अनेक इन्व्हेस्टमेंट वेबसाइट्सवर एसआयपी कॅल्क्यूलेटरचा पर्याय असतो. यात तुम्ही किती पैसे जमा केल्यावर किती वर्षात किती फंड तयार होईल याचा हिशोब करू शकता, माहिती मिळवू शकता.
15 टक्के रिटर्न -
SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही एखाद्या स्कीममध्ये 21 वर्षांपर्यंत दर महिन्याला 6000 रुपये म्हणजेच दिवसाला 200 रुपये जमा करत असाल, आणि यावर 15 टक्के रिटर्न मिळत असेल, तर या हिशोबानुसार 21 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.06 कोटी रुपयांचा फंड तयार होईल.
SIP कम्पाउंडिंग फायदा -
एसआयपीमध्ये कम्पाउंडिंगचा सर्वाधिक फायदा होतो. तुम्ही 21 वर्षात 200 रुपये दररोज या हिशोबाने 15.12 लाख रुपये गुंतवणूक करता. या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के रिटर्न मिळतात. म्हणजेच 91.24 लाख रुपये फायदा मिळते. गुंतवणुकीहून 6 टक्के अधिक तुमचा फायदा होतो.
कॅल्क्युलेटरनुसार, समजा तर तुम्ही एखाद्या स्कीममध्ये 21 वर्षांऐवजी 25 वर्षांपर्यंत दर महिन्याला 6000 रुपये म्हणजेच दिवसाला 200 रुपये जमा करत असाल, आणि त्यावर 15 टक्के रिटर्न मिळत असेल, तर 25 वर्षानंतर तुम्ही 1.97 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Mutual Funds, Savings and investments