नवी दिल्ली, 22 मे : एलआयसी (LIC) वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त स्कीम लाँच करत असतं. एलआयसी प्रत्येक वर्गातील लोकांसाठी योजना आणत असतं. अशात तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसह लखपती बनू इच्छित असाल, तर एलआयसीची ही पॉलिसी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. एलआयसी जीवन लाभ एक (LIC Jeevan Labh Policy) अशी पॉलिसी आहे, ज्यात तुम्ही दर महिन्याला केवळ 233 रुपये जमा करुन 17 लाखांचा मोठा फंड जमा करू शकता.
LIC Jeevan Labh Policy ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे. त्यामुळे या पॉलिसीचा शेअर मार्केटशी कोणताही संबंध नाही. मार्केट वर-खाली झाल्यासही याचा तुमच्या पैशांवर कोणताही परिणाम होत नाही. या स्कीममध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. हा एक लिमिटेड प्रिमियम प्लॅन (Limited Premium Plan) आहे. हा प्लॅन मुलांचं लग्न, शिक्षण आणि प्रॉपर्टी खरेदी करणं या गोष्टी लक्षात ठेवून करण्यात आला आहे.
पॉलिसीची वैशिष्ट्यं -
- एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी नफा आणि सुरक्षा दोन्ही देते.
- ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते.
- 16 ते 25 वर्षांपर्यंत पॉलिसी टर्म घेता येते.
- कमीत-कमी दोन लाख रुपयांचा सम एश्योर्ड घ्यावा लागेल.
- यात अधिकाधिक रकमेची कोणतीही मर्यादा नाही.
- 3 वर्षांपर्यंत प्रीमियम भरल्यानंतर लोनची सुविधाही यात मिळते.
- प्रीमियमवर टॅक्स सूट मिळते. तसंट पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची रक्कम आणि बोनस लाभही मिळतो.
- जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी काळात झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रीमियम जमा केला असेल, तर त्याच्या नॉमिनीला मृत्यूनंतर विमा रक्कम, सिंपल रिवर्सनरी बोनस आणि फायनल एडिशन बोनस मिळतो. म्हणजेच नॉमिनीला अतिरिक्त विमा रक्कम मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.