मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office change rules: पोस्ट ऑफिस उद्यापासून बदलणार ATM कार्ड आणि ट्रान्झॅक्शन संदर्भातील नियम, वाचा सविस्तर

Post Office change rules: पोस्ट ऑफिस उद्यापासून बदलणार ATM कार्ड आणि ट्रान्झॅक्शन संदर्भातील नियम, वाचा सविस्तर

तुमचे देखील पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (Saving Account in Post Office) आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट संदर्भातील नियमात बदल करण्यात (Post Office Saving Account Rule Change) आले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: तुमचे देखील पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (Saving Account in Post Office) आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट संदर्भातील नियमात बदल करण्यात (Post Office Saving Account Rule Change) आले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत. 1 ऑक्टोबरपासून एटीएम कार्डवर लावण्यात येणाऱ्या शुक्लामध्ये देखील बदल होणार आहे.

तुमचे पोस्टात खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी गरजेची आहे. विभागाने एका महिन्यात एटीएमच्या माध्यमातून केल्या जाणारे वित्तिय आणि गैर-वित्तिय ट्रान्झॅक्शन मर्यादित केले आहेत. जाणून घ्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत...

1. पोस्ट ऑफिसमध्ये नवीन एटीएम चार्ज

1 ऑक्टोबरपासून पोस्ट ऑफिसच्या एटीएम/डेबिट कार्डावरील वार्षिक मेंटेनन्स शुल्क 125 रुपये+जीएसटी असेल. हे नवीन शुल्क  1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत लागू करण्यात आले आहे.

Flipkart Big Billion Days मध्ये मोबाइल, लॅपटॉप, कपड्यांवर मिळेल 80% पर्यंत सूट

2. SMS अलर्टसाठी शुल्क

इंडिया पोस्ट आता त्यांच्या ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएस अलर्टसाठी 12+जीएसटी इतके शुल्क आकारणार आहे.

3. ATM हरवल्यास द्यावे लागेल इतके शुल्क

जर तुम्ही पोस्ट ऑफिस एटीएम वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जर तुमचे एटीएम 1 ऑक्टोबर नंतर हरवले असेल तर तुम्हाला दुसरे डेबिट कार्ड मिळवण्यासाठी 300 रुपये + जीएसटी शुल्क भरावे गेल. त्याच वेळी,  नवीन एटीएम पिनसाठी देखील शुल्क भरावे लागेल. यासाठी ग्राहकांना 50 रुपये + जीएसटी शुल्क भरावे लागेल.

आजच पूर्ण करा ही 6 आर्थिक आणि बँकेशी संबधित कामं, अन्यथा होईल मोठं नुकसान

4. मिनिमम बॅलन्स

ग्राहकाला किमान शिल्लक (Minimum Balance in Post Office Saving Account) राखणे देखील आवश्यक असेल. जर बचत खात्यात शिल्लक नसल्यामुळे एटीएम किंवा पीओएस व्यवहार नाकारला गेला तर ग्राहकाला त्यासाठी 20 रुपये + जीएसटी भरावा लागेल.

5. विनामूल्य व्यवहारांची संख्या देखील मर्यादित

नवीन नियमांनुसार, मूलभूत बचत खात्यात एका महिन्यात 5 व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतरच्या व्यवहारावर 10 रुपये+जीएसटी इतकं शुल्क आकारलं जाईल.

First published:

Tags: Post office, Post office bank, Post office money, Post office saving