मराठी बातम्या /बातम्या /मनी /Wishlist ठेवा तयार! Flipkart Big Billion Days Sale मध्ये मोबाइल, लॅपटॉप, कपड्यांवर मिळेल 80% पर्यंत सूट

Wishlist ठेवा तयार! Flipkart Big Billion Days Sale मध्ये मोबाइल, लॅपटॉप, कपड्यांवर मिळेल 80% पर्यंत सूट

यासाठी सर्वात आधी Flipkart App तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर App मध्ये अकाउंट लॉगइन करावं लागेल.

यासाठी सर्वात आधी Flipkart App तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर App मध्ये अकाउंट लॉगइन करावं लागेल.

Flipkart Big Billion Days Sale- सणासुदीच्या काळात शॉपिंग करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टवर विविध गोष्टींवर भरभक्कम सूट मिळणार आहे.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: सणासुदीच्या काळात (Sale during Festive season) स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी येत आहे. जिथे तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टींवर 80 टक्के सूट मिळेल. फ्लिपकार्टचा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि 10 ऑक्टोबरपर्यंत हा सेल लाइव्ह असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक उत्पादनांवर मोठी सूट मिळेल.

या सेलमध्ये ग्राहकांना Smartphones, Tablets, Smartwatch, Laptops, Earbuds यांसारख्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर भरभक्कम सूट मिळेल. Flipkart Plus मेंबर्ससाठी आधी सेल सुरू होईल. जे ग्राहक मेंबर नाही आहेत त्यांना अॅपवरून 50 सुपरकॉइनचा वापर करून सेलमध्ये सुरुवातीला खरेदी करता येईल.

मिळतील हे धमाकेदार प्रोडक्ट्स

या सेलमध्ये Oppo, Motorola, Realme, Poco, Vivo आणि Samsung चे नवीन प्रोडक्ट्स लाँच होतील. यामध्ये  Moto Tab G20, Motorola Edge 20 Pro, Realme 4K Google TV Stick इ. प्रोडक्ट्सचा समावेश आहे. फ्लिपकार्टने यावर्षी बिग बिलियन डे सेलसाठी ICICI बँक आणि Axis बँकेसह भागीदारी केली आहे. या बँकांच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड धारकांना विक्री दरम्यान अतिरिक्त ऑफर मिळतील. यासह, ग्राहक पेटीएम वॉलेट आणि यूपीआय द्वारे पैसे देऊन विशिष्ट कॅशबॅक मिळवू शकतील.

हे वाचा-Good News! या कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट बोनस, येणार वाढलेला पगार

किती मिळेल डिस्काउंट

>> फ्लिपकार्टने माहिती दिली आहे की, स्मार्टफोन श्रेणीमध्ये आयफोन 12, आयफोन 12 मिनी आणि आयफोन एसई वर सवलत दिली जाईल. आयफोन 12 सीरीजचे फोन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑफरसह आधीच उपलब्ध आहेत.

>> बिग बिलियन डे सेल दरम्यान सॅमसंग, ओपो आणि विवोच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळेल

>> कंपनी इंटेल प्रोसेसरसह सुसज्ज लॅपटॉप मॉडेल्सवर 40% पर्यंत सूट देईल. याशिवाय इतर लॅपटॉप मॉडेल्सवरही सूट मिळणार आहे.

>> TWS इयरबडवर 60% पर्यंत सूट, स्मार्टवॉच श्रेणीमध्ये फ्लॅट 70% आणि साउंडबारवर 80% पर्यंत सूट मिळवता येईल

हे वाचा- 6 महिन्याच्या निचांकी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर, काय आहे आजचा सोन्याचा भाव

>> टेलिव्हिजन आणि छोट्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर 70% पर्यतची सूट मिळेल, तर रेफ्रिजरेटरवर 50% पर्यतची सूट मिळवता येईल.

>> फॅशन आणि अॅक्सेसरीजवर कंपनी 60-80% पर्यत सूट देईल, तर फर्निचर तसंच गाद्या खरेदी करताना 85% पर्यंत सूट मिळेल.

First published:

Tags: Flipkart, Money