Home /News /money /

स्वस्त घर खरेदीसाठी मोदी सरकारच्या या योजनेचा घेऊ शकाल फायदा, वाचा सविस्तर

स्वस्त घर खरेदीसाठी मोदी सरकारच्या या योजनेचा घेऊ शकाल फायदा, वाचा सविस्तर

पीएम आवास योजनेअंतर्गत (PMAY) पहिल्यांदा घरखरेदी करणाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने या योजनेअंतर्गत येणारी क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (Credit Linked Subsidy Scheme- CLSS) 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे.

    नवी दिल्ली, 16 मे : पीएम आवास योजनेअंतर्गत (PMAY) पहिल्यांदा घरखरेदी करणाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने या योजनेअंतर्गत येणारी क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (Credit Linked Subsidy Scheme- CLSS) 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 2.5 लाख पेक्षा अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. वार्षिक 6 लाख ते 18 लाख रुपयांपर्यंत मिळकत असणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना CLSS देण्यात येते. म्हणजेच घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जावर व्याज सबसिडी दिली जाते. जास्तीत जास्त 2.67 लाख रुपयांपर्यंत ही सबसिडी देण्यात येते. जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेणार आहात, तर त्याबद्दल सर्व माहिती जाणून घ्या. (हे वाचा-मोठी बातमी! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार करणार या कायद्यात बदल) पंतप्रधान आवास योजना 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 3 ते 6 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्त्पन्न असणारा ग्रृप (LIG), तसंच 6 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न कमावणारे मध्यम उत्पन्न असणारा घटक (MIG-1) आणि 12 ते 18 लाख वार्षिक उत्पन्न कमावणारे मध्यम उत्पन्न असणारा घटक (MIG-2) यांचा समावेश होतो. कसा कराल अर्ज? पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता. https://pmaymis.gov.in/ या लिंकवर जाऊन तुम्हाला सविस्तर माहिती मिळवता येईल. जर तुम्ही LIG, MIG किंवा EWS कॅटेगरीमध्ये येता तर अन्य कंपोनेंट वर क्लिक करा. त्याठिकाणी तुम्हाला आधार, आधारवरील नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या पेजवर नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्य इत्यादी माहिती द्यावी लागेल. ही माहिती सबमिट करण्यासाठी दिलेला कॅप्चा कोड टाकून सबमिटवर क्लिक करा. असं तपासाल तुमचं नाव PMAY ग्रामीण लिस्ट-rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx या वेबसाइट वर जा. या साइटवर तुमच्या रजिस्ट्रेशन क्रमांक टाका आणि क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर विवरण येईल. रजिस्ट्रेशन क्रमांक नसल्यास अॅडव्हान्स सर्चवर क्लिक करा. यानंतर जो फॉर्म मिळेत तो भरावा लागेल. त्यानंतर सर्च पर्यायवर क्लिक करा. PMAY-G लिस्टमध्ये तुमचं नाव असल्यास सर्व माहिती तुमच्या समोर येईल. (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात या कंपनीचा मोठा निर्णय, वाढवणार कर्मचाऱ्यांचा पगार) PMAY शहरी लिस्ट- PMAY च्या अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in वर जा. बेनिफिशियरी सर्च असा मेन्यू दिसेल त्यामध्ये सर्च बाय नेमवर क्लिक करा. तिथे तुमच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहा. शो बटन वर क्लिक करून पीएम आवास योजनेची यादी तपासता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PM narendra modi, PMAY

    पुढील बातम्या