नवी दिल्ली, 15 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरातील अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटले आहे. ज्यामुळे या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची होणारी पगारवाढ थांबवली आहे. काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार कापले आहेत तर काहींनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. दरम्यान पेंट बनवणाऱ्या एशियन पेंट या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कंपनीने कोरोनाशी सामना करण्यासाठी आर्थिक मदत देखील देऊ केली आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्यांच्या कोव्हिड-19 फंडमध्ये एशियन पेंटने 35 कोटी रुपये दान केले आहेत. देशात कोरोना विरोधात लढण्यामध्ये कंपनी विविध प्रकारे मदत करण्यात येत आहे. पगारवाढ करण्यामागे एशियन पेंटचे असे उद्दिष्ट आहे की, यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यास मदत होईल. (हे वाचा- लॉकडाऊनचा मोठा झटका!3 मिनिटांच्या व्हिडीओ कॉलमध्ये गेली 3700 कर्मचाऱ्यांची नोकरी ) त्याचप्रमाणे एशियन पेंटने विक्री चॅनेलची देखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्री चॅनेलच्या ठेकेदारांच्या खात्यामध्ये कंपनीने 40 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित शिंगळे सांगतात की, आम्हाला खऱ्या नेतृत्वाचा पायंडा ठेवायचा आहे. आम्ही एक संस्था म्हणून आमच्या लोकांची काळजी घेतो, हेच यातून सिद्ध करायचे आहे. कंपनीच्या बोर्ड सदस्यांकडून देखील कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासंदर्भात सहमती मिळाली असल्याचं ते म्हणाले. (हे वाचा- बंद पडलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात ) त्यांच्या मते प्रत्येक कर्मचाऱ्याशी जोडले जाण्याची ही एक चांगली संधी आहे. सध्याच्या अनिश्चित बाजारात कर्मचाऱ्यांच्या चिंता दूर करणं आमती प्राथमिकता असल्याचंही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांना कामावर घ्यायचं आणि काढून टाकायचे या सिद्धांतावर आम्ही काम करत नाही तर उलट आम्ही त्यांना सांगू इच्छितो का या संकटकाळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशा शब्दात त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत माहिती दिली. संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.