नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: कोरोना काळात अनेकांनी नोकरी (Coronavirus Job Loss) गमावली आहे. अद्यापही मोठा तरुणवर्ग नोकरीच्या (New Job Alert) शोधात आहे. दरम्यान लसीकरणानंतर (Vaccination Drive in India) कोरोनाचं संकट काही अंशी कमी होऊ लागलं आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर (Indian Economy after 2nd Wave of Coronavirus) होत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर (2nd Wave of Coronavirus) आता देशाची अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत आहे. त्याचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजना सुरू करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Scheme by PM Narendra Modi Government) यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्यावरुन गति शक्ती योजनेची (Gati Shakti Yojana Launch Date) घोषणा केली होती. आता 100 लाख कोटी रुपयांची ही योजना आज म्हणजेच 13 ऑक्टोबर 2021 रोजी लाँच केली जाईल. या योजनेद्वारे देशात रोजगाराच्या (Job Opportunities) नवीन संधी निर्माण होतील. देशाच्या मास्टर प्लॅन आणि पायाभूत सुविधांची पायाभरणी करण्यात ही योजना मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. वाचा- Vodafone Idea साठी येणार ‘अच्छे दिन’, 1000 कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता लोकल उत्पादनं ग्लोबल करण्याचा मानस या योजनेतून साध्य केला जाणार आहे. स्थानिक उत्पादकांना प्रधानमंत्री गती शक्ती योजनेद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले जाईल. यामुळे उद्योगांचा विकास होईल. 15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या योजनेमध्ये रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, पेट्रोलियम आणि गॅस, वीज, दूरसंचार, शिपिंग, विमानचालन आणि औद्योगिक उद्याने या केंद्र सरकारच्या 16 विभागांना समाविष्ट केले जाईल. केंद्राच्या सर्व 16 विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांचा नेटवर्क नियोजन ग्रुप तयार केला जाईल. प्रधानमंत्री गती शक्ती योजनेची वैशिष्ट्ये » 75व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गती शक्ती योजनेची घोषणा केली होती » गती शक्ती योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे. » पीएम गति शक्ती योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. » ही योजना पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल. वाचा- सोन्याच्या किंमतीत उसळी तर चांदीची झळाळी उतरली, तपासा लेटेस्ट भाव » स्थानिक निर्मात्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले जाईल. » योजनेअंतर्गत नवीन आर्थिक क्षेत्रेही विकसित केली जातील. » आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधकामात समग्र दृष्टिकोन स्वीकारला जाईल. » या योजनेद्वारे संपूर्ण पायाभूत सुविधांचा पाया घातला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.