मुंबई, 12 ऑक्टोबर: भारतीय सराफा बाजारात आज मंगळवारी 12 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) वाढले आहेत. आजच्या वाढीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 46 हजार रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. आज चांदीच्या किंमती (Silver Price Today) मात्र कमी झाल्या आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 46,157 रुपये होते. तर चांदीचे दर 60,489 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातही (Gold Price Today in International Market) सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही आहे. सोन्याचे आजचे दर (Gold Rate Today on 12th October 2021) आज मंगळवारी सोन्याचा भाव 129 रुपये प्रति तोळाने वाढला आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर दिल्लीतील सराफा बाजारात 46,286 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 1,757 डॉलर प्रति औंसवर आहेत. वाचा- Remdesivirचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर ITची धाड, कपाटं-बॉक्समध्ये सापडले 142 कोटी चांदीचे आजचे दर (Silver Rate Today on 12th October 2021) चांदीच्या किंमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर 120 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यामुळे चांदी आज 60,369 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल न झाल्याने दर 22.56 डॉलर प्रति औंसवर आहेत. वाचा- 6 कोटी PF खातेधारकांच्या खात्यात येणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे तपासा स्टेटस का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या स्पॉट किमतीतील स्थिरतेचा परिणाम सराफा बाजारातील सोन्याच्या किमतींवर दिसून आला आहे. त्याचवेळी, फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 75 पैशांच्या घसरणीसह 75.42 च्या पातळीवर व्यवहार करत होता. यामुळे सोन्याच्या किमतीत उसळी नोंदवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.