नवी दिल्ली, 25 डिसेंबर: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतीचा पुढील हप्ता जारी केला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत पाठवली जाते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बटण प्रेस करून 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत जारी करण्यात आली आहे.
PM Narendra Modi releases Rs 18,000 crore as the next instalment under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme to over 9 crore farmers pic.twitter.com/3vxIAvgwF3
— ANI (@ANI) December 25, 2020
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटरवरून माहितीही दिली होती. या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही येणार पैसे काही शेतकरी असे देखील आहेत, जे शेती करतात मात्र ते या योजनेचे लाभार्थी नाही आहेत. या योजनेच्या लाभार्थी सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. या अटींनुसार लाभार्थी होण्यासाठी शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या वडिलांचा किंवा आजोबांच्या नावे शेतजमीन असेल तर ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. काही शेतकरी शेती करतात मात्र त्यांच्या नावे शेतीयोग्य जमीन नसेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन झालं नाही आहे, त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळाला नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देखील एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांचा उल्लेख केला आहे. राज्य सरकारने दीर्घ काळासाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया रोखून धरल्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीट नुसार प. बंगालमधील 70 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही आहे तर 23 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी याकरता ऑनलाइन अर्ज केला आहे. परंतू राज्य सरकारने त्यांचे व्हेरिफिकेशन केलेलं नाही.
मुझे आज इस बात का अफसोस है कि मेरे पश्चिम बंगाल के 70 लाख से अधिक किसान भाई-बहनों को इसका लाभ नहीं मिल पाया है।
— PMO India (@PMOIndia) December 25, 2020
बंगाल के 23 लाख से अधिक किसान इस योजना का लाभ लेने के लिए ऑनलाइन आवेदन कर चुके हैं।
लेकिन राज्य सरकार ने वेरिफिकेशन की प्रक्रिया को इतने लंबे समय से रोक रखा है: PM
(हे वाचा- ‘शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करू’,मोदी सरकारमधील मंत्र्यांचं आश्वासन ) अनेकवेळा शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होतं की, ते पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी रजिस्टर करतात पण त्यांना पैसे मिळत नाहीत. जर तुमच्याबरोबर देखील असा प्रकार घडला असेल तर तुमचं या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का हे तपासणं गरजेचं आहे. घरबसल्या तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. असं तपासा तुमचं नाव -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता. -याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. -‘फार्मर कॉर्नर’वर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक करा. (हे वाचा- EDचा कृषी कर्ज घोटाळ्यात रासप आमदाराला झटका, ‘गंगाखेड’ची 255 कोटी मालमत्ता जप्त ) -याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. -याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता यादीमध्ये नाव नसल्यास काय कराल? लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव नसल्यास याची तक्रार तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी हेल्पलाइनवर करू शकता. 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्हाला कॉल करता येईल.