केंद्र सरकारने गुरुवारी आंदोलनातील शेतकरी संघटनांना रखडलेली चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी निमंत्रण धाडले आहे. तसंच तीन नवीन कृषी कायद्यांबाबत असणाऱ्या विरोध संपवण्यासाठी त्यांच्या सोयीने चर्चेसाठी तारीख निवडायला सांगितले आहे. शुक्रवारी मनी ट्रान्सफर इव्हेंट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. (हे वाचा-स्वस्त सोनेखरेदीची वर्षातील शेवटची संधी, ऑनलाइन पेमेंटवर अतिरिक्त डिस्काउंट) पण शेतकरी संघटनांनी असा आरोप केला आहे की, सरकारचे आताचे पत्र हे केवळ शेतकऱ्यांविरोधात असा प्रचार करणे आहे की त्यांना चर्चा करण्यात रस नाही आहे. 40 शेतकरी संघटनांचा सहभाग असणारी 'संयुक्त किसान मोर्चा' शुक्रवारी केंद्राबरोबर बैठक करण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमाभागात ते गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या बैठकीदरम्यान केंद्राच्या पत्राबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.Many farmers have thanked PM Modi for the new agriculture laws. We will double farmers' income by 2022. The government is ready to talk and clear doubts of the farmers who are protesting. A solution can be found only through dialogue: Union Minister Anurag Thakur pic.twitter.com/kmsVrAxk5J
— ANI (@ANI) December 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Narendra modi, PM narendra modi, Protesting farmers