• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • COVID-19: पंतप्रधानांची अर्थमंत्र्यांबरोबर महत्त्वाची बैठक, लवकरच दुसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता

COVID-19: पंतप्रधानांची अर्थमंत्र्यांबरोबर महत्त्वाची बैठक, लवकरच दुसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह काही महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक घेतली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाह (Home Minster of India Amit Shah) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यासह काही महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये लॉकडाऊनमुळे प्रभावित क्षेत्रांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याबाबत चर्चा  झाली. या बैठकीमध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयातील काही अधिकारी देखील सहभागी झाले होते. काय असणार दुसऱ्या आर्थिक पॅकेजमध्ये? -Reuters या वृत्तसंस्थेच्या मते सरकार कोरोना व्हायरसमुळे प्रभावित क्षेत्रांना मदत करण्याठी जास्तीत जास्त 4.5 लाख (60 अब्ज डॉलर) कोटींपर्यंत खर्च करू शकते -याचं कारण हे आहे की, सरकारला या गोष्टीची भीती आहे की एका मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यास सॉवरेन रेटिंग कमी होईल. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे,वाचा कशी काढाल रक्कम) -यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. अर्थ मंत्रालयच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, आम्ही आधीच जीडीपीच्या 0.8 टक्के पॅकेज दिलं आहे. जीडीपीच्या 1.5%-2% इतकं आणखी पॅकेज देण्याची क्षमता असल्याचंही ते म्हणाले. नोकरदार वर्गासाठी होऊ शकतात मोठ्या घोषणा Reuters ने दिलेल्या माहितीनुसार या पॅकेजमध्ये देशातील गरिबांप्रमाणेच त्यांचा विचार केला जाईल ज्यांची नोकरी गेली आहे किंवा जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे करामध्ये सूट देऊन छोट्या-मोठ्या कंपन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याची अट घालून यासंदर्भात माहिती दिली आहे. कारण या मुद्द्यावर अद्याप चर्चा सुरू आहे. 'या' सेक्टर्ससाठी देखील मोठ्या घोषणा होऊ शकतात -याआधी पंतप्रधानांनी गुरूवारी वेगवेगळ्या 3 बैठका घेतल्या आहेत. पहिली बैठक विदेशी गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावर पार पडली. यामध्ये विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांना चांगल्या सुविधा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत Plug & Play मॉडेलवर भर देण्यात आला. (हे वाचा-छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा,मोदी सरकारच्या आदेशानंतर या बँकेची मोठी मदत) -औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी काही विशेष योजना राबवण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की याकरता वेळेनुसार योग्य मंजूरी मिळणे आवश्यक आहे. या बैठकीस अर्थमंत्री आणि उद्योग मंत्री उपस्थित होते. -दुसऱ्या बैठकीमध्ये कोळसा आणि खाण व्यवसायाच्या विकासाबाबत चर्चा झाली. यासंदर्भात रणनिती आखण्यात आली. पंतप्रधान यावेळी म्हणाले की, निर्यात करण्याऐवजी विविध क्षेत्रांमध्ये घरगुती कोळशाचा वापर व्हायला हवा. अतिरिक्त ब्लॉकचा लिलाव लवकरात लवकर करण्यात येईल असा निर्णय या बैठकीमध्ये करण्यात आला. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये 'या' बँकेचा परवाना रद्द, लाखो खातेधारकांना RBIचा झटका) -लिलावाची प्रक्रिया अधिक  आकर्षक आणि पारदर्शक असेल. मिनरल क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा सल्ला यावेळी पंतप्रधानांनी दिला. या सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम होण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: