लॉकडाऊनमध्ये 'या' बँकेचा परवाना रद्द, लाखो खातेधारकांना RBIचा झटका

लॉकडाऊनमध्ये 'या' बँकेचा परवाना रद्द, लाखो खातेधारकांना RBIचा झटका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) ने सीकेपी सहकारी बँकेच्या (CKP Cooperative Bank) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. या बँकेचा परवाना RBI कडून रद्द करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) ने सीकेपी सहकारी बँकेच्या (CKP Cooperative Bank) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. या बँकेचा परवाना RBI कडून रद्द करण्यात आले आहे. मनीकंट्रोल ने दिलेल्या माहितीनुसार यामुळे जवळपास 11 हजार गुंतवणूकदार आणि ठेवीदार तर सव्वा लाख खातेधारकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बँकेतील 485 कोटींची एफडी (Fixed Deposit) सुद्धा अडकली आहे. 2014 पासून या बँकेवर निर्बंध आणण्यासाठीचा कालावधी आरबीआयकडून वाढवण्यात येत आहे. याआधी 31 मार्चपर्यंत देण्यात आलेला अवधी वाढवून 31 मे करण्यात आला होता. मात्र त्याआधीच बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

बँकेचा परवाना रद्द होण्याची कारणं

सीकेपी सहकारी बँकेच्या नेटवर्थमध्ये झालेली घसरण हे बँकेचा परवाना रद्द होण्यामागचं महत्त्वाचं कारण असल्याची माहिती मनीकंट्रोलने दिली आहे. 2016 मध्ये बँकेची नेटवर्थ 146  कोटी होती जी आता 230 कोटींवर पोहोचली आहे. ऑपरेशनल फायदा होऊनही नेटवर्थमध्ये घसरण झाल्याने बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

(हे वाचा-Reliance Jio ला चौथ्या तिमाहीत मोठा फायदा, नफ्यात 177 टक्यांची वाढ)

-मुंबईतील दादर याठिकाणी सीकेपी सहकारी बँकेचं मुख्यालय आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार बँकेचा तोटा वाढत होता आणि नेटवर्थमध्ये देखील मोठी घसरण होत होती. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर 2014 मध्ये निर्बंध आणले होते. त्यानंतर अनेक वेळा बँकेचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

-यासाठी गुंतवणुकदारांनी, ठेवीदारांनी देखील प्रयत्न केले होते. त्यांचे व्याजदर घटवून 2 टक्क्यांपर्यंत आणले होते.

(हे वाचा-आर्थिक संकटात रिलायन्सने घेतले मोठे निर्णय; मुकेश अंबानींनी सोडलं वेतन)

-काही खातेधारकांनी त्यांच्या एफडीचे रुपांतर शेअर्समध्ये केलं होते. त्याचा काहीसा परिणाम देखील पाहायला मिळत होता.

-बँकेचं नुकसान काही प्रमाणात कमी होत होते. मात्र तेवढ्यातच आरबीआयकडून बँकेच्या खातेधारकांना मोठा झटका देण्यात आला आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 2, 2020, 11:03 AM IST

ताज्या बातम्या