मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan: तुमच्या स्टेटसमध्ये लिहिलं आहे Waiting for approval by state? वाचा काय आहे याचा अर्थ

PM Kisan: तुमच्या स्टेटसमध्ये लिहिलं आहे Waiting for approval by state? वाचा काय आहे याचा अर्थ

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

PM Kisan: तुम्ही देखील तुमचे अकाउंट तपासा की त्यात Waiting for approval by state असा मेसेज लिहिलेला तर नाही आहे ना. जाणून घ्या काय आहे या मेसेजचा अर्थ...

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर: सरकारने पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 10वा हप्ता जारी करण्याची तारी निश्चित केली आहे. साधारण 15 डिसेंबरपर्यंत हा हप्ता जारी केला जाईल.  पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

गेल्यावर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. आता हा लाभ मिळण्यासाठी केवळ एकाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमचे अकाउंट तपासा की त्यात Waiting for approval by state असा मेसेज लिहिलेला तर नाही आहे ना. जाणून घ्या काय आहे या मेसेजचा अर्थ...

हे वाचा-रेल्वेसह सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 80000 रुपयांपर्यंत कमाई; वाचा सविस्तर

अशाप्रकारे तपासा स्टेटस

-याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

-त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता.

-Beneficiary Status च्या पर्यायावर क्लिक करा आणि त्याठिकाणी नवीन पेज ओपन होईल

-याठिकाणी आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडून Get Data वर क्लिक करा

-याठिकाणी तुम्हाला तुमच्या सर्व ट्रान्झॅक्शन्सची माहिती मिळेल.

-तुमचा हप्ता का थांबवण्यात आला आहे आणि पुढील हप्ता कधी येईल याबाबत तुम्हाला याठिकाणी माहिती मिळेल

-स्टेटसमध्ये पुढील हप्त्याबाबत Waiting for approval by state किंवा Rft Signed by State Government किंवा FTO is Generated and Payment confirmation is pending असं लिहिण्यात आलं असेल.

हे वाचा-पेटीएम IPO मध्ये गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? काय आहेत फायदे आणि तोटे?

तुमच्या खात्यात दिसतं आहे का असं स्टेटस?

पुढील हप्त्याच्या स्टेटससमोर Waiting for approval by state असं स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी अजून वेळ आहे. तुमच्या राज्य सरकारने तुमच्या खात्यावर 2000 रुपये पाठवण्यास मान्यता दिलेली नाही. तुम्ही दिलेली कागदपत्रे राज्य सरकार तपासून पाहिल, त्यानंतर केंद्र सरकार Rft Sign करून पाठवेल.

Rft Sign म्हणजे काय?

अनेकदा तुम्हाला Rft Signed by State for 1st, 2nd, 3rd, 4th, 5th 6th, 7th, 8th, 9th installment नमूद केलेलं दिसेल. याठिकाणी Rft चा फूल फॉर्म Request For Transfer असा आहे, याचा अर्थ लाभार्थीचा डेटा राज्य सरकारने तपासला आहे आणि तो बरोबर असल्याचे आढळले आहे. राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती करते.

हे वाचा-Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई

अशा प्रकारे खात्यात ट्रान्सफर  केले जातात पैसे

पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्या अर्जाची राज्य सरकारकडून पडताळणी केली जाते. तुमचा महसूल रेकॉर्ड, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक इ. बाबी तपासल्या जातात. राज्य सरकार तुमच्या खात्याची पडताळणी करेपर्यंत पैसे येत नाहीत. राज्य सरकारने पडताळणी करताच, एफटीओ तयार केला जातो. यानंतर केंद्र सरकार खात्यात पैसे ट्रान्सफर करते.

First published:

Tags: PM Kisan