• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Business Idea: रेल्वेसह सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 80000 रुपयांपर्यंत कमाई

Business Idea: रेल्वेसह सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 80000 रुपयांपर्यंत कमाई

indian railways

indian railways

इंडियन रेलवे केटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC) ही एक रेल्वेची सेवा आहे. ज्याअंतर्गत तिकिट बुकिंग सेवा दिली जाते. आयआरसीटीसीच्या मदतीने तुम्ही दरमहाा हजारो रुपयांची कमाई करू शकता.

 • Share this:
  मुंबई, 07 नोव्हेंबर: कोरोना लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळात लोकांनी जेवढे कष्ट भोगले तेवढ्याच अनेक गोष्टी शिकल्या देखील. या काळात अनेक लोकांनी शिकलेली गोष्ट म्हणजे- व्यवसाय! इच्छा असणाऱ्यांनी छोटेखानी का होईना स्वत:चा (Start Small Business) असा व्यवसाय सुरू केला. तुम्ही देखील अशाप्रकारे व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. जाणून घ्या अशाच एका भन्नाट बिझनेस आयडियाबद्दल... इंडियन रेलवे केटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC) ही एक रेल्वेची सेवा आहे. ज्याअंतर्गत तिकिट बुकिंग सेवा दिली जाते. आयआरसीटीसीच्या मदतीने तुम्ही दरमहाा हजारो रुपयांची कमाई करू शकता. तुम्ही तिकिट एजंट बनून रेल्वेच्या माध्यमातून ही कमाई करू शकता. ज्याप्रमाणे रेल्वे काउंटर्सवर क्लर्क्सकडून तिकिट दिले जाते, त्याचप्रमाणे तुम्हाला प्रवाशांना तिकिट द्यावे लागेल. हे वाचा-Post Office PPF : पोस्ट ऑफिसची 'ही' योजना सुरक्षित करेल निवृत्तीनंतरचं आयुष्य कशाप्रकारे कराल अप्लाय? अशाप्रकारे ऑनलाइन तिकिट काढून देण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन एजंट बनण्यासाठी अप्लाय करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑथराइज्ड तिकिट बुकिंग एजंट (Ticket booking agent) बनता येईल. अशाप्रकारे तिकिट बुकिंग केल्यानंतर आयआरसीटीकडून एजंट्सना चांगले कमिशन मिळते. किती मिळेल कमिशन? कोणत्याही प्रवाशासाठी नॉन एसी कोचचे तिकिट बुक केल्यानंतर 20 रुपये प्रति तिकिट आणि एसी क्लास तिकिट बुक केल्यानंतक 40 रुपये प्रति तिकिटचे कमिशन मिळते. याशिवाय तिकिटाच्या किंमतीचा एक टक्के हिस्सा देखील एजंटला मिळतो. हे काम करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तिकिट बुक करण्याची कोणतीही मर्यादा नाही आहे. दरमहा तुम्ही कितीही तिकिट बुक करू शकता. याशिवाय 15 मिनिटांत तत्काळ तिकिट बुक करण्याचाही पर्याय मिळतो. एक एजंट म्हणून तुम्ही ट्रेनव्यतिरिक्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिट देखील बुक करू शकता. हे वाचा-एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, ₹4 चा शेअर पोहोचला 75 रुपयांवर 80,000 रुपयांपर्यंत होऊ शकते कमाई एका महिन्यात एजंट किती तिकीट बुक करू शकतात यावर मर्यादा नाही. त्यामुळे एका महिन्यात अमर्यादित तिकिटे बुक करता येतात. एजंटना प्रत्येक बुकिंग आणि व्यवहारावर कमिशन मिळते. एजंट दरमहा 80,000 रुपयांपर्यंत नियमित उत्पन्न मिळवू शकतो. काम थोडे कमी असेल तर सरासरी 40 50 हजार रुपये मिळू शकतात. किती द्यावे लागेल शुल्क? जर तुम्हाला एका वर्षासाठी एजंट व्हायचे असेल तर IRCTC ला 3,999 रुपये शुल्क भरावे लागेल, तर दोन वर्षांसाठी हे शुल्क 6,999 रुपये आहे. त्याच वेळी, एजंट म्हणून, एका महिन्यात 100 तिकिटे बुक करण्यासाठी, 10 रुपये शुल्क आकारले जाईल, तर एका महिन्यात 101 ते 300 तिकिटे बुक करण्यासाठी प्रति तिकिट 8 रुपये आणि एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिटे बुक करण्यासाठी 5 रुपये प्रति तिकिट शुल्क आकारले जाईल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: