• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Paytm IPO : पेटीएम IPO मध्ये गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? काय आहेत फायदे आणि तोटे?

Paytm IPO : पेटीएम IPO मध्ये गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? काय आहेत फायदे आणि तोटे?

Paytm Payment Bank Ltd.

Paytm Payment Bank Ltd.

Paytm चा इश्यू 8 नोव्हेंबरला ओपन होईल आणि 10 नोव्हेंबरला बंद होईल. 18300 कोटींपैकी 8300 कोटींचा फ्रेश इश्यू जारी करण्यात आला आहे. तर 10,000 कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये (Offer For Sale) विकले गेले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चा 18,300 कोटींचा IPO 8 नोव्हेंबर रोजी ओपन होणार आहे. याचा प्राईड बँड 2080-2150 रुपये आहे. जर पेटीएमचा हा इश्यू पूर्णपणे सबस्क्राईब झाला तर हा भारतातील सर्वात मोठा IPO असेल. यापूर्वी कोल इंडियाचा इश्यू सर्वात मोठा होता जो 2010 मध्ये आला होता. Paytm चा इश्यू 8 नोव्हेंबरला ओपन होईल आणि 10 नोव्हेंबरला बंद होईल. 18300 कोटींपैकी 8300 कोटींचा फ्रेश इश्यू जारी करण्यात आला आहे. तर 10,000 कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये (Offer For Sale) विकले गेले आहेत. मिंटच्या वृत्तानुसार, Angel One चे इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट (DVP) ज्योती रॉय यांनी सांगितले की, Paytm चे वॅल्युएशन जास्त वाटू शकतं, परंतु ते डिजिटल पेमेंटचं दुसरं नाव बनले आहे. मोबाईल पेमेंट्सच्या क्षेत्रातही ते मार्केट लीडर आहेत. FY 2021 पासून 2026 पर्यंत मोबाइल पेमेंटची 5 पट वाढ होईल आणि Paytm त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याच्या स्थितीत आहे. म्हणूनच, असे म्हणता येईल की पेटीएमचे महागडे वॅल्युएशन देखील योग्य आहे. आम्ही गुंतवणूकदारांना हा इश्यू विकत घेण्याचा सल्ला देतो." Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई Choice Broking चे विश्लेषक दीर्घ मुदतीसाठी पेटीएमच्या इश्यू सबक्राईब करण्याची शिफारस करत आहेत. पेटीएमसाठी बाजारातील संधी, उत्पादन आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन या इश्यूमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पेटीएम नवीन व्यापारी आणि ग्राहक जोडण्यासाठी नवीन इश्यूमधून जमा केलेला निधी वापरण्याची योजना आखत आहे. वॅल्युएशनवर गुंतवणूकदारांसोबत मतभेद झाल्यामुळे पेटीएमने प्री-आयपीओ फंड उभारला नाही. उद्यापासून बंद होणार सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी ही सुविधा,या आहेत गाइडलाइन पेटीएमच्या इश्यूबाबत, आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, दररोज नवीन तंत्रज्ञानामुळे पेमेंट मार्केटमधील स्पर्धा लक्षणीय वाढली आहे. जर पेटीएम व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली नाही, तर त्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम होईल. कंपनीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत पेमेंट सेवा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यातील जोखीम आणि फायदे समजून घेऊन गुंतवणूक करावी. भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ पेटीएमचा आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर होता. कोल इंडियाने एका दशकापूर्वी आपल्या आयपीओमधून सुमारे 15,000 कोटी रुपये उभारले होते. विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये One97 ची सुरुवात केली. सुरुवातीला कंपनी वॅल्यू अॅडेड सर्विस प्रोव्हाडर म्हमून सुरू झाली. नंतर ती ऑनलाईन मोबाईल पेमेंट फर्ममध्ये डेव्हलप झाली.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: