PM Kisan: मोदी सरकारने पाठवलेले 2000 रुपये मिळाले नाहीत? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार

PM Kisan: मोदी सरकारने पाठवलेले 2000 रुपये मिळाले नाहीत? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार

तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी असाल आणि अद्याप तुम्हावा मोदी सरकारने या योजनेअंतर्गत पाठवलेला हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे: तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी असाल आणि अद्याप तुम्हावा मोदी सरकारने या योजनेअंतर्गत पाठवलेला हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 14 मे रोजी मोदी सरकार (Modi Government) ने या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ही रक्कम हस्तांतरित केली.

या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही त्या शेतकऱ्यांपैकी असाल, ज्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार दाखल करून शकता. याशिवाय तुम्ही तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता.

हे वाचा-मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, मिळाले 2000 रुपये;वाचा सबंधित इतर योजनांचे फायदे

अनेकदा सरकारकडून पैसे पाठवले जातात मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचत नाहीत. यामध्ये काही तांत्रिक कारणं देखील असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

2000 रुपये मिळवण्यासाठी इथे करा तक्रार

या योजनेसंदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता आणि त्यांना सविस्तर माहिती देऊ शकता. तिथे तुमचं काम न झाल्यास या योजनेकरता सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता.

या क्रमांकावर करा संपर्क

पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता.

हे वाचा-Mutual Fund-FD मध्ये मर्यादेपेक्षा जास्त डिपॉझिट नको, येईल इन्कम टॅक्सची नोटीस

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 15, 2021, 12:17 PM IST

ताज्या बातम्या