मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Fund आणि FD मध्ये या मर्यादेपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट नको, येईल इन्कम टॅक्सची नोटीस

Mutual Fund आणि FD मध्ये या मर्यादेपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट नको, येईल इन्कम टॅक्सची नोटीस

प्राप्तिकर कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीची करदेयता वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना चार हप्त्यांमध्ये म्हणजेच 15 जुलै,15 सप्टेंबर,15 डिसेंबर आणि 15 मार्च पूर्वीचा आगाऊ कर भरावा लागेल. जर असे टॅक्स भरले नाही, तर करदात्याला दंड भरावा लागतो. आयकर नियमानुसार, करदात्यास 15, 45, 75 आणि 100 टक्के अशा चार हप्त्यांमध्ये आगाऊ कर भरावा लागतो. जर करदाता अंतिम मुदतीत अग्रीम कर भरु शकला नाही तर कलम 234 बी आणि 234 सी अंतर्गत व्याज भरावे लागतं. जर तुम्ही 15 मार्चपर्यंतचा चौथा हप्ता भरला नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत तो 31 मार्चपूर्वी भरावा. 31 मार्चपर्यंत पेमेंट भरल्यास ती रक्कम आगाऊ कर समजला जातो.

रोखीचे व्यवहार आणि डिजिटल डिपॉझिट्सवर इन्कम टॅक्स विभागाची (Income Tax Department) नजर असते. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, बाँड किंवा डिबेंचरमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त रोख गुंतवली तर आयकर विभाग नोटीस पाठवू शकते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 15 मे: तुम्ही शेअर मार्केट (Share market), म्युच्युअल फंड (Mutual fund), डिबेंचर (Debenture) आणि बॉन्डमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही करत असणाऱ्या रोखीचे व्यवहार आणि डिजिटल डिपॉझिट्सवर इन्कम टॅक्स विभागाची (Income Tax Department) नजर असते. तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त रोख गुंतवली तर आयकर विभाग नोटीस पाठवू शकते.  कॅश ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत आयकर विभागाने नियम अत्यंत कठोर आहेत. तुम्ही कोणतंही मोठं ट्रान्झॅक्शन करत असाल, जसं की बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाउस किंवा प्रॉपर्टी रजिस्ट्रारमध्ये केला जाणारा मोठा व्यवहार, तर त्याची माहिती तुम्ही आयकर विभागाला देणं अपेक्षित आहे. आयकर विभागाच्या अशाप्रकराच्या व्यवहारांवर (Deposit and Withdrawal) करडी नजर असते.

मुंबई स्थित कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांनी न्यूज18 हिंदीला माहिती देताना असे म्हटले आहे की, तुम्ही जर मोठ्या संख्येचं ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्वरित अलर्ट व्हा. कारण एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून बोलवण्यात येऊ शकतं.

हे वाचा-मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, मिळाले 2000 रुपये;वाचा सबंधित इतर योजनांचे फायदे

जैन यांच्या मते तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit FD) मध्ये एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल, हे ट्रान्झॅक्शन रोख स्वरुपात झालं असेल किंवा डिजिटल स्वरुपात इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला या पैशांचा स्रोत विचारू शकतं. त्याचप्रमाणे तुम्हाला नोटीस देखील येऊ शकते.

कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ जितेद्र सोळंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्युच्युअल फंड, डिबेंचर, स्टॉक मार्केट आणि बाँड यामध्ये तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त कॅशमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. तुम्ही डिजिटली जरी 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते. या व्यवहारांची माहिती इन्कम टॅक्सला देणं आवश्यक आहे.

स्टॉक मार्केटमध्ये बँक ड्राफ्टद्वारे कॅश डिपॉझिट करण्याच्या मर्यादेबाबत बलवंत जैन म्हणाले की, जर तुम्ही कॅशचा वापर बँक ड्राफ्ट मिळवण्यासाठी आणि ती Demat Account मध्ये डिपॉझिट करत असाल तर याची माहिती ब्रोकरेज फर्म आणि बँक दोघांकडून इन्कम टॅक्स विभागाला दिली जाते. या प्रकरणातही इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते आणि ही नोटीस अधिक गंभीर आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Fixed Deposit, Income tax, Money