Home /News /money /

PM Kisan अंतर्गत शेतकऱ्यांना मिळाले 2000 रुपये, वाचा यासंबंधित इतर योजना आणि त्यांचे फायदे

PM Kisan अंतर्गत शेतकऱ्यांना मिळाले 2000 रुपये, वाचा यासंबंधित इतर योजना आणि त्यांचे फायदे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अर्थात 14 मे रोजी मोदी सरकार (Modi Government) ने या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ही रक्कम हस्तांतरित केली. जाणून घ्या केंद्र सरकार यासह शेतकऱ्यांना इतर कोणत्या योजना देत आहे

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 15 मे: शेतकऱ्यांसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा होता. खास करून त्या शेतकऱ्यांसाठी जे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अर्थात 14 मे रोजी मोदी सरकार (Modi Government) ने या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी ही रक्कम हस्तांतरित केली. या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. PM Kisan योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरुपात 20000 कोटींपेक्षाही जास्त रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित केली गेली आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. केंद्राच्या या महत्त्वाकांक्षी योजनेशी संबंधित इतरही काही योजना आहेत ज्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. जाणून घ्या या कोणत्या योजना आहेत ज्या शेतकऱ्याचं वर्तमान आणि भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मदत करतील. हे वाचा-Akshay Tritiya: मुहूर्तावर करा सोन्यामध्ये गुंतवणूक, नफा मिळवण्याची सुवर्णसंधी शेतकरी मानधन योजना जर तुम्ही पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेचे खातेधारक असाल तर तुमची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल. एवढेच नव्हे तर या पेन्शन योजनेसाठी तुमचे योगदान देखील सन्मान निधी योजनेच्या पैशातून कापले जाईल. शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल. याकरता प्रत्येक शेतकऱ्याच्या वयानुसार, दर महिन्याचं योगदान कमीत कमी 55 ते जास्तीत जास्त 200 रुपये आहे. अर्थात कमीत कमी 660 रुपये वार्षिक तर जास्तीत जास्त 2400 रुपये वार्षिक भरावे लागतील. आतापर्यंत 21,27,759 शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची वेबसाइट www.pmkisan.gov.in यावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे वाचा-मोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधी!बाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळण्याची प्रक्रिया वेगाने व्हावी याकरता पीएम शेतकरी सन्मान योजनेसह शेतकरी क्रेडिट कार्ड योजना जोडण्यात आली आहे. यामुळे ज्या बँक खात्यात 6000 रुपयांचा हप्ता जमा होतो, त्यांच्यासाठी KCC बनवणे सोयीचे ठरते. KCC अंतर्गत शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. आतापर्यंत 1.82 कोटी शेतकऱ्यांना 1,63,627 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत? पंतप्रधान पीकी वीमा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, पशु किसान क्रेडिट कार्ड योजना, परंपरागत कृषी विकास योजना, पंतप्रधान कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM), डेअरी आंत्रप्रेन्योरिशिप डेव्हलपमेंट स्कीम, रेनफीड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, सॉइल हेल्थ कार्ड स्कीम, नॅशनल मिशन फॉर सस्टेनबल अॅग्रीकल्चर, पशुधन वीमा योजना, सिंचनासाठी सब्सिडी, वीजेसाठी सब्सिडी, कर्जासाठी सब्सिडी इ.

    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PM Kisan, PM Naredra Modi

    पुढील बातम्या