• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • PM Kisan: लवकरच खात्यामध्ये येतील 2000 रुपये, तपासा तुम्हाला लाभ मिळणार की नाही?

PM Kisan: लवकरच खात्यामध्ये येतील 2000 रुपये, तपासा तुम्हाला लाभ मिळणार की नाही?

केंद्र सरकारनं 24 फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 9व्या हप्त्याचे (9th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये पुढील महिन्यात शेतकर्‍यांच्या (Farmers) खात्यात जमा होणार आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 13 जुलै: केंद्र सरकारनं 24 फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 9व्या हप्त्याचे (9th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये पुढील महिन्यात शेतकर्‍यांच्या (Farmers) खात्यात जमा होणार आहेत. या योजनेद्वारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देते. वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. त्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता पुढील महिन्यातच तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. हे पैसे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात. आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपली नाव नोंदणी (Registration for PM Kisan Samman Nidhi Yojana) करणं आवश्यक असून, त्याकरता शेतीसंबाधित कागदपत्रे, आधारकार्ड, बँक खाते, पत्त्याचा पुरावा, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो. तुम्ही नावनोंदणी केलेली असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. हे वाचा-डूल, चमकी, नथ अशा हलक्या दागिन्यांवर परिणाम; Gold Hallmarking चे नवे नियम पुढील प्रक्रियेद्वारे जाणून घ्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार की नाही - सर्वांत आधी पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा. - इथं उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल, तिथं ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा. - आता एक नवीन पेज उघडेल. - या पेजवर, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक या पर्यायांपैकी एक निवडा. - जो पर्याय निवडला आहे त्यावर क्लिक करा. - तिथं संबंधित क्रमांक भरा. - यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा. - इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. - इथं शेतकऱ्याचे नाव, मोबाइल क्रमांक, आधार, राज्य, जिल्हा, गाव, खाते क्रमांक, नोंदणी तारीख आणि नोंदणी क्रमांक दिसेल. - आता इथं Active आणि In Active ऑप्शन दिसेल. हे वाचा-तुमच्या बँकेतून अचानक पैसे गायब झालेत? मग सर्वात आधी करा 'हे' काम - Active दिसत असेल तर तुमचे खाते सुरू आहे, असा याचा अर्थ आहे. - म्हणजेच तुमच्या खात्यावर नववा हप्ता जमा होण्यात काहीही अडचण नाही. यादीतही तपासा नाव  लाभार्थ्यांच्या यादीत (Beneficiary List )आपलं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी पीएम किसानच्या वेबसाइटवर ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary List’वर क्लिक करा. तिथं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव या लिस्टमधून आपले पर्याय निवडा. नंतर ‘Get Report’वर क्लिक करा. लाभार्थ्यांची सगळी यादी दिसेल. आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकता. हे वाचा-EPFO:नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी;या 5 चुकांमुळे काढता येणार नाही PF रक्कम तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात. - पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266 - पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक : 155261 - पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक : 011- 23381092, 23382401 - पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन : 011- 24300606 - आणखी एक हेल्पलाईन : 0120-6025109 - ईमेल आयडी: pmkisan-ict@gov.in
First published: