मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO: नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी; या 5 चुकांमुळे काढता येणार नाहीत PF चे पैसे

EPFO: नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी; या 5 चुकांमुळे काढता येणार नाहीत PF चे पैसे

तुम्हाला पीएफमधून पैसे काढायचे असतील तर अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर 3 दिवसांत तो मंजूर होऊन 5 दिवसांच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र काहीवेळा पैसे लगेच मिळत नाहीत. अशावेळी तुमच्या खात्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असण्याची शक्यता असते.

तुम्हाला पीएफमधून पैसे काढायचे असतील तर अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर 3 दिवसांत तो मंजूर होऊन 5 दिवसांच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र काहीवेळा पैसे लगेच मिळत नाहीत. अशावेळी तुमच्या खात्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असण्याची शक्यता असते.

तुम्हाला पीएफमधून पैसे काढायचे असतील तर अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर 3 दिवसांत तो मंजूर होऊन 5 दिवसांच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र काहीवेळा पैसे लगेच मिळत नाहीत. अशावेळी तुमच्या खात्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असण्याची शक्यता असते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 जुलै : नोकरदार व्यक्तींसाठी निवृतीनंतर मिळणारी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंड फंड (EPF) अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. मुलांचं लग्न, शिक्षण, अकस्मात खर्च यासाठी या फंडातून गरजेच्या वेळी पैसे काढता येतात. त्यामुळे पीएफ (PF) हा अनेकांचा मोठा आधार असतो. तुम्हाला पीएफमधून पैसे काढायचे असतील तर अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर 3 दिवसांत तो मंजूर होऊन 5 दिवसांच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र काहीवेळा पैसे लगेच मिळत नाहीत. अशावेळी तुमच्या खात्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीतील आपली गुंतवणूक आपल्या गरजेच्या वेळी लगेच मिळावी यासाठी काही बाबतीत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या बाबी अपूर्ण असतील तर आपल्या पीएफचे पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

कोणत्या कारणांनी पैसे अडकू शकतात?

- बँक खात्याचा तपशील चुकीचा (Wrong Bank Account Details) असणं

- केवायसी (KYC) अपूर्ण असणं

- जन्मतारीख (Wrong Birth date) चुकीची असणं

- यूएएन (UAN) आधारशी (Aadhaar) लिंक केलेला नसणं

- अटी पूर्ण केलेल्या नसणं, या कारणांनी पीएफमधील पैसे मिळण्यास अडचणी येतात.

बँक खात्याचा चुकीचा तपशील -

तुम्ही तुमच्या बँक खात्याची (Bank Account) माहिती देताना काही चुकीची माहिती दिली असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल. ईपीएओमध्ये (EPFO) तुम्ही ज्या बँक खात्याची माहिती देता त्याच खात्यात पैसे येतात. त्यात चूक झाली असेल किंवा अर्जात नमूद केलेलं बँक खातं आणि नोंदणीकृत बँक खातं यात फरक असेल, तर पैसे मिळण्यात अडचण येते. तुम्ही नोंदणी केलेलं बँक खातं तुमच्या यूएएनशी (UAN) (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) लिंक केलं जावं.

(वाचा - पोस्टाच्या या योजेनेतून वर्षाला मिळवता येतील 60 हजार रुपये; असा होईल डबल फायदा)

केवायसी पूर्ण नसेल तर -

तुमचं केवायसी (KYC) अपूर्ण आणि व्हेरीफाय झालेलं नसल्यास ईपीएफओ तुमचा दावा नाकारू शकते. आपल्या ई-सेवा अकाउंटमध्ये लॉग इन करून केवायसी पूर्ण आणि व्हेरीफाय आहे की नाही ते तपासू शकता.

जन्मतारीख चुकीची असेल तर -

ईपीएफओमध्ये नोंदलेली जन्म तारीख( Birth date) आणि एम्प्लॉयरच्या रेकॉर्डमध्ये नोंदलेली जन्म तारीख यात फरक असेल किंवा आधारच्या आधारे ती वेगळी असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. ईपीएफओनं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, ईपीएफओच्या नोंदींमध्ये असलेली जन्म तारीख दुरुस्त करणं आणि यूएएनला (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधारशी जोडण्यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता 3 वर्षांपर्यंत जन्मतारीख दुरुस्त करता येतं.

(वाचा - काउंटरवर खरेदी केलेलं तिकीट ऑनलाईन कसं कराल कॅन्सल, असं मिळेल रिफंड)

यूएएन आधारशी लिंक केलेलं नसणं -

तुमचा यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधारशी जोडलेला नसेल, तर पैसे काढण्याचा दावा नाकारला जाऊ शकतो. यूएएन किंवा ईपीएफ अकाउंट आधारला जोडण्याचे चार मार्ग आहेत. तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही एका मार्गाने तुम्ही यूएएन आधारशी लिंक करू शकता.

अटी पूर्ण न झाल्यास -

आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही पैसे काढत असाल तर तीन अटी पूर्ण करणं सर्वात महत्त्वाचं आहे. या तीन अटी पूर्ण न केल्यास तुमचा अर्ज रद्द होईल. पहिली अट म्हणजे तुमचा यूएएन सक्रिय असणं आवश्यक आहे. दुसरी अट तुमचं अकाउंट आधार व्हेरीफाईड आणि युएएनशी जोडलेलं असणं आवश्यक आहे आणि तिसरी अट म्हणजे योग्य आयएफएससीसह बँक अकाउंट यूएएनशी जोडलेलं असावं. या व्यतिरिक्त, सदस्याची स्वाक्षरी स्पष्ट असावी आणि ती रेकॉर्डशी जुळली पाहिजे, अन्यथा दावा फेटाळला जाईल.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, PF Withdrawal