नवी दिल्ली, 13 जुलै: तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन क्रांती होत आहेत. यामुळे दिवसेंदिवस जग वेगाने डिजिटल बनत चाललं आहे. त्यासोबतचं ऑनलाइन फसवणूकीची (Online Fraud) सुद्धा प्रकरणे वाढत आहेत. यामध्ये बँकिंग फसवणूकीची (Banking Fraud) प्रकरणे जास्त समोर येतात. बँक अकाउंटची (Bank Account) सर्व माहिती घेऊन हॅकर्स खात्यातून पैसे चोरत आहेत. यामुळे बँका आणि आरबीआय (RBI) सतत आपल्या ग्राहकांना याविषयी सतर्क करत असते. RBI कडून कोणत्याही प्रकारची माहिती किंवा ओटीपी (OTP) कोणासोबत शेअर न करण्याचा सल्ला देण्यात येतो. तसंच कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित बँकेला कळवणं आवश्यक आहे. त्वरित बँकेला कळवून आपण आपलं नुकसान कमी करू शकता. चला तर, मग याबद्दल अधिक जाणून घेऊया. पूर्ण पैसे कसे परत मिळवणार? आता आपल्याला कदाचित असा प्रश्न पडला असेल की, एकदा व्यवहार (Transaction) पूर्ण झाला तर पैसे परत कसे मिळतील? तसंच, बँकेकडे अकाउंटमधून पैसे चोरीला गेल्याची तक्रार केली तर बँक कोठून पैसे परत करेल. मात्र अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीचा विचार करुन बँका इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy) घेतात. झालेल्या फसवणूकीची सर्व माहिती बँका थेट विमा कंपनीला देतात. इन्शुरन्स कंपनीकडून पैसे घेऊन बँका आपल्याला नुकसानीची भरपाई करतात. सायबर फसवणूक टाळण्यासाठी इन्शुरन्स कंपन्या लोकांना थेट कव्हरेज देत आहेत. फसवणूकीनंतर 3 दिवसांच्या आत तक्रार करावी बँक अकाउंटमधून चोरी झाली तर त्वरित बँकेकडे तक्रार करावी. तीन दिवसांत बँकेत तक्रार केली तरच आपल्याला पैसे परत मिळू शकतील. RBI ने असंही सांगितलं आहे की, ग्राहकांच्या अकाउंटमधून फसवणूक करून काढलेली रक्कम ठराविक वेळेमध्ये बँकेला कळविल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक अकाउंटमध्ये परत केली जाईल. मात्र जर 4 ते 7 दिवसानंतर चोरीची तक्रार केली तर ग्राहकालाच 25,000 रुपयांचं नुकसान सहन करावं लागेल. हे वाचा - EPFO:नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी;या 5 चुकांमुळे काढता येणार नाही PF रक्कम किती पैसे परत मिळतील? बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉझिट अकाउंट (Basic Saving Deposit Account) म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट (Zero Balance Account) असेल तर आपली लायबिलिटी (Liability) 5000 रुपये असेल. म्हणजेच जर आपल्या बँक खात्यातून 10,000 रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला तर आपल्याला बँकेद्वारे फक्त 5000 रुपये परत मिळतील. उर्वरित 5000 रुपयांचं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल. सेव्हिंग अकाउंटसाठी नियम सेव्हिंग अकाउंटमधून (Saving Account) अनधिकृत व्यवहार झाला असेल तर आपली लायबिलिटी 10,000 रुपये असेल. म्हणजेच जर आपल्या खात्यातून 20,000 रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला असेल तर तुम्हाला बँकेकडूनन फक्त 10,000 रुपये परत मिळतील. उर्वरित 10,000 रुपयांचं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल. क्रेडिट कार्ड (Credit Card) साठी नियम करंट अकाउंट (Current Account) किंवा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त लिमिट असलेल्या क्रेडिट कार्डदारे अनधिकृत व्यवहार झाला तर आपली लायबिलिटी 25,000 रुपये असेल. म्हणजेच, आपल्या अकाउंटमधून 50 हजार रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला असेल तर बँक तुम्हाला फक्त 25,000 रुपये देईल. उर्वरित 25,000 रुपयांचं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.