Home /News /money /

कानातले डूल, चमकी, नथ अशा हलक्या वजनाच्या दागिन्यांवर परिणाम; Gold Hallmarking चे नवे नियम लागू

कानातले डूल, चमकी, नथ अशा हलक्या वजनाच्या दागिन्यांवर परिणाम; Gold Hallmarking चे नवे नियम लागू

गोल्ड हॉलमार्किंगसाठी (Gold Hallmarking) केंद्र सरकारने 15 जूनपासून नवे नियम (jewellery hallmark news) लागू केले आहेत

नवी दिल्ली, 12 जुलै: गोल्ड हॉलमार्किंगसाठी (Gold Hallmarking) केंद्र सरकारने 15 जूनपासून नवे नियम (jewellery hallmark news) लागू केले आहेत; मात्र जुन्या म्हणजेच अँटिक ज्वेलरीवर या नियमात काही तरतूद नाही. आता नव्या नियमाप्रमाणे 2 ग्रॅमच्या वर सर्व दागिन्यांना हॉलमार्किंग असणं बंधनकारक आहे. पण सराफ मात्र या ही मर्यादा 5 ग्रॅमपर्यंत वाढवावी अशी मागणी करत आहेत. कारण या हॉलमार्किंग नियमामुळे हलक्या दागिन्यांच्या मजबुतीवर परिणाम होईल, अशी ज्वेलर्सची भीती आहे. ज्वेलर्सना दोन ग्रॅमऐवजी पाच ग्रॅमपर्यंतच्या ज्वेलरीवर हॉलमार्किंगसाठी सवलत हवी आहे. जेम आणि ज्वेलरी उद्योजकांची राष्ट्रीय मुख्य संस्था असलेल्या ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (GJC) या बाबतीत सरकारशी बातचीत केली आहे. GJCचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी न्यूज 18ला सांगितलं, की सध्याच्या कायद्यात स्पष्टतेचा अभाव आहे. सरकारने त्यांची ही बाब मान्य करून या संदर्भात एक समिती स्थापन केली आहे. अँटिक (Antique Jewellery) अर्थात खूप जुन्या दागिन्यांचा व्यवहार वेगळा होतो, असं पेठे सांगतात. नव्या नियमानुसार वागायचं झालं, तर हे जुने दागिने वितळवून त्यांच्यापासून नवे दागिने तयार करावे लागतील. तसं झालं तर त्या दागिन्यांना असलेली अँटिक व्हॅल्यू आणि त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन (Special Design) या दोन्ही गोष्टी संपुष्टात येतील. अनेक मंदिरांमध्ये, तसंच अनेकांच्या घरांतही असे जुने दागिने असल्याचं पेठे सांगतात. 150 वर्षं जुन्या असलेल्या सी. कृष्णय्या चेट्टी या हेरिटेज ज्वेलरी हाउसचे व्यवस्थापकीय संचालक सी. विनोद हयग्रीव यांनी सांगितलं, की अनेक जुने दागिने हे वैशिष्ट्यपूर्ण कलेचं प्रतिनिधित्व करतात. अनेक कुटुंबांना ते वारसा स्वरूपात मिळाले आहेत, तसंच अनेक मंदिरांतही ते आहेत. हे दागिने जसे आहेत, तसे पुन्हा विकले जातात किंवा त्यांचा लिलाव केला जातो. नव्या नियमाचं पालन करायचं झालं, तर भारताच्या हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष नष्ट करून टाकल्यासारखं होईल. नव्या दागिन्यांची गुणवत्ता उच्च राखण्यासाठी हॉलमार्किंग नियम तयार करणं हे एक उत्तम पाऊल आहे; मात्र सगळेच जुने दागिने वितळवून त्यापासून नवे दागिने करणं बंधनकारक केलं जाऊ नये. Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण,खरेदीची चांगली संधी;पाहा आजचा लेटेस्ट रेट मुंबईल ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी न्यूज 18ला सांगितलं, की सध्याच्या नियमानुसार दोन ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या दागिन्यांना गोल्ड हॉलमार्किंग आवश्यक नाही. त्यात नथ, कानातली बाळी अशा काही दागिन्यांचा समावेश होतो; पण त्यातल्या काही दागिन्यांचं वजनही पाच ग्रॅमपर्यंत असू शकतं. त्यांचं असं म्हणणं आहे, की नथ, बाळी किंवा रत्नजडित ज्वेलरी 60 ते 65 टक्के शुद्ध असलेल्या सोन्यापासूनच बनवता येऊ शकते. 18 कॅरेट सोन्यापासून ही ज्वेलरी तयार केल्यास ती तुटते. तसंच जास्त शुद्ध असलेल्या सोन्याची तार असलेले दागिने कान आणि नाकात परिधान करण्यास त्रास होतो, असंही ते सांगतात. ज्वेलर्सची मागणी ज्वेलर्स म्हणतात, की 16,20 आणि 23 कॅरेट सोन्याचेही दागिने (Gold Jewellery) मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे या कॅरेट्सनाही हॉलमार्किंगच्या परिप्रेक्ष्यात आणण्याची गरज आहे. अँटिक ज्वेलरीला या नियमांतून बाहेर काढण्याची गरज आहे. जुन्या स्टॉकच्या स्थितीबद्दल अधिकृतपणे नियम जाहीर होण्याची गरज आहे. तसंच, सरकारने हॉलमार्कसाठी लागणाऱ्या HUID सीलसमवेत अन्य अटींचं अधिकृत नोटिफिकेशनही अद्याप प्रसिद्ध केलेलं नाही, असं ज्वेलर्स म्हणतात. Good News! मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोनं, RBI ने जारी केली किंमत हॉलमार्किंगचे नवे नियम 15 जूनपासून लागू झाले आहेत; मात्र सरकारने हे नियम सुरुवातीला देशातल्या 256 जिल्ह्यांतच लागू केले आहेत. तेथे तपासणी करणारी हॉलमार्किंग सेंटर्स आहेत. 40 लाख रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल असलेल्या ज्वेलर्सना अनिवार्य हॉलमार्किंगमधून सवलत देण्यात आली आहे. तसंच या नियमांचं पालन केलं नाही, तरी ऑगस्ट महिन्यापर्यंत सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. घड्याळं, फाउंटन पेन, त्याप्रमाणेच कुंदन, पोल्की आदी प्रकारच्या दागिन्यांनाही हॉलमार्किंग बंधनकारक नाही.
First published:

Tags: Gold, Gold price, Jewellery shop

पुढील बातम्या