मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM kisan: 27 लाख शेतकऱ्यांचं ट्रान्झॅक्शन फेल, या चुकांमुळे अडकतील तुमचेही पैसे

PM kisan: 27 लाख शेतकऱ्यांचं ट्रान्झॅक्शन फेल, या चुकांमुळे अडकतील तुमचेही पैसे

PM kisan Samman Nidhi Yojna: तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. मात्र शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पैसे अडकून जातात

PM kisan Samman Nidhi Yojna: तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. मात्र शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पैसे अडकून जातात

PM kisan Samman Nidhi Yojna: तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. मात्र शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पैसे अडकून जातात

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 22 जुलै: तुम्ही देखील पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan) नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये पाठवला जाईल. . मात्र शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पैसे अडकून जातात. केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. एकूण तीन हप्ते अर्थात 6000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळतो. आतापर्यंत या योजनेचे आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे.

PM किसानच्या पोर्टलनुसार, 27 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या रकमेचं ट्रान्झॅक्शन फेल झालं आहे. शेतकऱ्यांच्या छोट्या चुकांमुळे त्यांना पैसे मिळाले नाही आहेत. तुम्ही आयएफएससी कोडी, बँक खाते क्रमांक किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणती चूक केली असेल तर सर्वात आधी ही चूक सुधारा. जेणेकरुन पुढचा हप्ता मिळताना कोणतीही समस्या येणार नाही.

हे वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे! मोबाइलमध्ये सेव्ह असतील हे नंबर तर खातं होईल रिकामं

या कारणामुळे अडकतील पैसे

-शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे

-अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलात शेतकऱ्याच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी असल्यास

-आधार कार्डावरील नाव अर्जावर असणं आवश्यक

-आयएफएससी कोड चुकीचा असल्यास अडकतील पैसे

-बँक खाते क्रमांक योग्य नसल्यास पैसे अडकतील

हे वाचा-Gold Price: रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, तपासा आजचा भाव

ऑनलाइन सुधारा तुमच्या चुका

सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा. त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता, तर खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता. शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता.

यादीत तपासा नाव

लाभार्थ्यांच्या यादीत (Beneficiary List )आपलं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी पीएम किसानच्या वेबसाइटवर ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary List’वर क्लिक करा. तिथं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव या लिस्टमधून आपले पर्याय निवडा. नंतर ‘Get Report’वर क्लिक करा. लाभार्थ्यांची सगळी यादी दिसेल. आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकता.

First published:

Tags: Farmer, PM Kisan, PM narendra modi