जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, इथे तपासा लेटेस्ट भाव

Gold Price Today: रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, इथे तपासा लेटेस्ट भाव

Gold Rates Today

Gold Rates Today

Gold Price Today: सोन्याच्यांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा (Gold-Silver Price) घसरण पाहायला मिळाली आहे. आज एमसीएक्सवर सोन्यासह चांदीचे दरही उतरले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जुलै: सोन्याचांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) आजही घसरण पाहायला मिळाली आहे. आज गुरुवारी एमसीएक्सवर (MCX) सोन्यासह चांदीच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा मोठ्या फरकाने कमी झाले आहेत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) ऑगस्टच्या डिलिव्हरीचे सोन्याचे दर 0.22 टक्क्यांच्या घसरणीने ट्रेड करत आहेत. तर चांदीच्या दरात देखील आज 0.07 टक्क्यांची घसरण झाली आहे. रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर (Gold Rates on MCX) सोन्याचे भाव 56200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. हा दर आतापर्यंतचा सर्वोच्च (Gold Rates on Record High) आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 47,470 रुपये प्रति तोळा आहेत. अर्थात आज सोन्याचे दर प्रति तोळा साधारण 8,530 रुपयांनी स्वस्त आहेत. तपासा सोन्याचे नवे दर (Gold Price Today, 22 July 2021) एमसीएक्सवर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्यामध्ये आज 0.22 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47,470 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर आहेत. हे वाचा- पूर्ण करा स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न! ही बँक स्वस्तात विकतेय प्रॉपर्टी चांदीचे नवे दर (Silver Price Today, 22 July 2021) सोन्यापाठोपाठ आज चांदीचे दर देखील 0.07 टक्क्यांनी उतरले आहेत. चांदीमध्ये आज किरकोळ घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर चांदीचे दर 67,089 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचले आहेत. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. हे वाचा- Ration Card आहे महत्त्वाचा दस्तावेज, वाचा कशाप्रकारे बनवाल नवीन कार्ड? सोनं शुद्ध आहे हे कसं ओळखाल? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात