• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • PM Kisan: खूशखबर! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, तपासा तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही?

PM Kisan: खूशखबर! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, तपासा तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नववा हप्ता लवकरच पाठवण्यात येणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 02 जुलै: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढी हप्ता लवकरच पाठवण्यात येणार आहे. या पुढील हप्ता नववा हप्ता (PM Kisan 9th Installment) असणार आहे. नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये पाठवला जाईल. केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेचे आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे. आतापर्यंत तुम्हाला नाही मिळाले पैसे तर अशाप्रकारे तपासा यादीमध्ये तुमचं नाव तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला हे माहित करणं आवश्यक आहे की या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही. लिस्टमध्ये असं तपासा नाव: -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता. हे वाचा-सोन्याच्या किंमतीमध्ये मोठा बदल! सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी -याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. -'फार्मर कॉर्नर'वर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक करा. -याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. -याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स  आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता. तुम्ही मिळणाऱ्या हप्त्याचं स्टेटस देखील अशाप्रकारे जाणून घेऊ शकता. हे वाचा-LIC ने लाँच केला नवा प्लॅन! एकदा प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 यादीमध्ये नाव नसल्यास काय कराल? लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव नसल्यास याची तक्रार तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी हेल्पलाइनवर करू शकता. 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्हाला कॉल करता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: