• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये मोठा बदल! सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये मोठा बदल! सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी

Gold Price Today: तुम्ही जर सोनेचांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 जुलै: तुम्ही जर सोनेचांदी (Gold and Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या आठवड्याच्या सुरुवातील घसरण पाहिल्यानंतर सोन्याचे दर (Gold Price Today) 47,000 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 137 रुपयांनी वाढली आहे. आज सोन्याचे दर एमसीएक्सवर 0.32 टक्क्यांनी वाढून 47,188 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले आहेत. तर सप्टेंबरच्या चांदीचे दर (Silver Price Today) 0.26 टक्क्यांनी वाढून 69,299 रुपये प्रति किलो झाले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज सोन्याचे दर 45000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. महानगरातील सोन्याचे दर मेट्रो शहरांबाबत बोलायचं झालं तर मुंबईमध्ये (Gold Rates in Mumbai) 22 कॅरेट सोन्याचा दर 46,190 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 47,190 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 44,430 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48,470 रुपये आहे. राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,150 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 50,150 रुपये प्रति तोळा आहे. बेंगळुरुमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 44,000 रुपये आणि 24 कॅरेटचा दर 48,000 रुपये तोळा आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेटचा दर 46,340 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,050 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा-LIC ने लाँच केला नवा प्लॅन! एकदा प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर स्वस्त गेल्यावर्षी या सीझनमध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 56191 रुपये या स्तरावर पोहोचले होते. या तुलनेत सध्या स्वस्त दरात सोनं मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर जवळपास 9 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहेत. हे वाचा-छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे,सरकारने घेतला हा निर्णय सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी यावेळी सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 9000 रुपयांनी स्वस्त आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात यामध्ये बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगल्या कमाईची संधी मिळू शकते. सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला आहे. त्या आधीच्या वर्षीही सोन्याने दिलेला परतावा सुमारे 25 टक्के होता. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सध्या सोनं गुंतवणूकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: