• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • LIC ने लाँच केला नवा प्लॅन! एकदा प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000, कर्ज मिळण्याचीही सुविधा

LIC ने लाँच केला नवा प्लॅन! एकदा प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000, कर्ज मिळण्याचीही सुविधा

LIC ने एक फायद्याची योजना 1 जुलैपासून लाँच केली आहे. सरल पेन्शन योजना असं या स्कीमचं नाव आहे, जाणून घ्या कशाप्रकारे ही योजना तुमच्या फायद्याची ठरेल

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 जुलै: LIC ने एक फायद्याची योजना 1 जुलैपासून लाँच केली आहे. सरल पेन्शन योजना (Saral Pension scheme) असं या स्कीमचं नाव आहे. LIC Saral Pension scheme ही एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम योजना आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर देखील तुम्ही ही योजना खरेदी करू शकता. या स्कीममध्ये पॉलिसी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी कोणत्याही वेळी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. ही योजना तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करता येईल. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही एक मानक तात्काळ अ‍ॅन्युइटी योजना आहे, जी सर्व जीवन विमाधारकांना समान अटी व शर्ती प्रदान करते. वाचा कशाप्रकारे खरेदी कराल प्लॅन? LIC ची नवीन Saral Pension scheme तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. याकरता तुम्हाला www.licindia.in या वेबसाइटवर जावं लागेल. या प्लॅनअंतर्गत मिनिमम अ‍ॅन्युइटी 12000 रुपये प्रति वर्ष आहे. किमान खरेदी किंमत अ‍ॅन्युइटी मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणार्‍याचे वय यावर अवलंबून असते. जास्तीत जास्त खरेदी किंमतीची मर्यादा नाही. ही योजना 40 ते 80 वर्षे वयोगटातील उपलब्ध आहे. हे वाचा-छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे,सरकारने घेतला हा निर्णय किती करावी लागेल गुंतवणूक? या प्लॅन अंतर्गत तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी 1 हजार रुपये दरमहा भरावे लागतील. शिवाय तिमाही पेन्शनसाठी कमीत कमी एका महिन्यात तीन हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. मिळतील दोन पर्याय LIC च्या या स्कीमअंतर्गत पॉलिसीधारकाला सिंगल प्रीमियम पेमेंटवर दोन पर्यायांपैकी अ‍ॅन्युइटी निवडण्याचा पर्याय आहे. पहिल्या पर्यायाअंतर्गत पॉलिसी होल्डरला आयुष्यभर पेन्शन मिळेल आणि त्याचा मृत्यू झाल्यात 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला देण्यात येईल. दुसरा पर्याय असा आहे की पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जोडीदार, पती किंवा पत्नी यांना आयुष्यभर पेन्शन मिळेल. लास्ट सरव्हायवरच्या मृत्यूनंतर 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला देण्यात येईल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: