• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • खूशखबर! या दिवशी तुमच्या PF खात्यात येईल 8.5 टक्के व्याज, त्वरित तपासा तुमचा बॅलन्स

खूशखबर! या दिवशी तुमच्या PF खात्यात येईल 8.5 टक्के व्याज, त्वरित तपासा तुमचा बॅलन्स

EPF खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम (EPFO Interest amount) जुलैअखेरपर्यंत ट्रान्सफर होऊ शकते. ईपीएफओने आर्थिक वर्ष 2020-21 साठी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जुलै: देशभरातील 6 कोटी नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही देखील पीएफ (PF Account)वर मिळणाऱ्या व्याजाच्या प्रतीक्षेत असाल, तर लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. EPF खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम (EPFO Interest amount) जुलैअखेरपर्यंत ट्रान्सफर होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पीएफ खातेधारकांना सरकार 8.5 टक्के दराने व्याज जुलै महिनाअखेर ट्रान्सफर करू शकतं. ईपीएफओने आर्थिक वर्ष 2020-21 साठी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आहे. गेल्या सात वर्षातील हा सर्वात कमी व्याजदर आहे. याआधी 2012-13 मध्ये सरकारने 8.5 टक्के दराने व्याज दिले होते. आर्थिक वर्ष 2019-20 वर्षात 8.50 टक्के दराने पीएफवर व्याज मिळाले होते. 2018-19 मध्ये हा दर 8.55 टक्के होता. तर 2017-18 या आर्थिक वर्षात हा दर 8.65 टक्के होता. दरम्यान तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल तर काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही ही रक्कम तपासून शकता. अगदी घरबसल्या एसएमएस पाठवून देखील तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता.  याकरता तुम्हाला तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणं आवश्यक आहे. तुम्हा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन मेसेज पाठवून PF Balance तपासता येईल. जाणून घ्या घरबसल्या पीएफ तपासण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. हे वाचा-Petrol-Diesel Price: लवकरच स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? आज दर रेकॉर्ड स्तरावर 1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. 2. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता हे वाचा-Gold price today: आज 7922 रुपयांनी स्वस्त मिळेल सोनं, इथे तपासा लेटेस्ट भाव 3. Umang App च्या माध्यमातून याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता. 4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: